Nashik Kumbh Mela News: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्याने प्रशासकीय पातळीवर विकासकामांना आता वेग आला आहे. त्यादृष्टीने विकासकामांच्या निविदा काढल्या जात असून स्थानिक ठेकेदारांना काम मिळावं अशी मागणी शहरातील तीन्ही भाजप आमदारांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत केली.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने ९३० कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. त्यात महापालिका क्षेत्रात काम मिळाल्यानंतर ४५ दिवसात डांबर व रेडी मिक्स काँक्रिट प्लान्ट (आरएमसी) उभारण्याची अट घालण्यात आली आहे.
परंतु या अटीमुळे निवेदत स्पर्धा निर्माण होऊन परराज्यातील ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात काम मिळू शकते. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांवर अन्याय होईल अशी भावना तीन्ही आमदारांनी व्यक्त केली. तसेच यामुळे स्थानिकांमध्ये रोष वाढतो आहे असेही सांगितले.
त्यामुळे ४५ दिवसांमध्ये प्लांट उभारण्याची अट वगळण्यात यावी अशी मागणी तीनही आमदारांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी सदर अट शिथिट करण्याच्या सूचना मनपा आयुक्त मनिषा खत्री यांना दिल्या.
परंतु याच मुद्यावर तीनही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामे मिळवण्यासाठी स्थानिक ठेकेदार विरुद्ध परराज्यातील ठेकेदार असा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
शहरातील तीनही आमदारांचे म्हणणे आहे की, ज्या ठेकेदारांना काम मिळणार आहे त्यांच्यावर काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाची देखभाल दुरुस्ती करण्याची देखील जबाबदारी असणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परराज्यातील ठेकेदारांना रस्त्याचे काम मिळाले व काम झाल्यानंतर ते ठेकेदार परागंदा झाल्यास त्याची जबाबादारी कोणी घ्यायची? असा सवाल आमदारांनी उपस्थित केला.
नाशिकमध्ये पूर स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या कुंभमेळा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आमदारांनी भेट घेत हे सगळे मुद्दे उपस्थित केले. त्यानंतर आता एवढ्यावरच न थांबता आता तीनही भाजपचे आमदार या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.