Lok Sabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Exit Poll 2024 : खासदार विखेंना धक्का बसणार, लंके आघाडीवर राहणार

Lok Sabha Election 2024 Result Sujay Vikhe v/s Nilesh Lanke Fight : भाजप आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नगर शहरात सभा झाली होती.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke V/S Sujay Vikhe : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके टीव्ही-9 एक्झिट पोलनुसार आघाडीवर दाखवले गेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना पिछाडीवर दाखवले आहे. उमेदवार खासदार विखे एक्झिट पोलनुसार पराभवाच्या छायेत दिसत आहेत. भाजप आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नगर शहरात सभा झाली होती.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर झाली होती. यानंतर त्यांच्याविरोधात उमेदवार कोण? याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे सुरूवातीला चेहरा नव्हता. परंतु नीलेश लंके यांचे नाव समोर येते होते. राजकीय घडामोडीनंतर नीलेश लंके यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर नीलेश लंके यांचे नाव उमेदवारीच्या चर्चेत आले. नीलेश लंके विरोधात नको, म्हणून विखेंनी देव पाण्यात घातले होते. परंतु शरद पवार यांनी राजकीय खेळी करत लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खेचून घेत निवडणुकीच्या मैदानात आणले. लंकेंची उमेदवारी जाहीर होताच विखे यंत्रणा वेगाने कामाला लागली.

सुजय विखे यांनी गेल्या पंचवार्षिकला भाजपकडून उमेदवारी करताना भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी सर्व हवेदावे बाजूला सारून काम केले. पंरतु यंदा मात्र तसे झाले नाही. गेल्या पंचवार्षिकचा अनुभवानुसार भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते विखे यंत्रणेमुळे हात राखून काम करत होती. विखे यंत्रणेचा हस्तक्षेप वाढल्याने भाजपच्या (BJP) निष्ठावान कार्यकर्त्यांनी प्रचारापासून लांबच राहणे पसंत केले. परिणाम मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी भाजपच्या बूथ केंद्रावर दुपारनंतर माणसे दिसत नव्हती. त्यातुलनेत नीलेश लंके यांनी नेमलेल्या सर्वच बूथ केंद्रावर माणसे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कार्यरत होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, महायुती भाजपमध्ये रंगलेले नाराजी नाट्य तर, महाविकास आघाडीमध्ये दिसलेला एकसंघपणा! खासदार सुजय विखे यांना पक्षातंर्गत असलेल्या नाराजांची नाराजी दूर करण्यात बराच वेळ गेला. भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांची नाराजी सर्वाधिक होती. तुलनेत महाविकास आघाडीमध्ये एकसंघपणा पाहायला मिळत होता. शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांनी नीलेश लंकेंसाठी घेतलेली मेहनत आणि त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकसंघ आणले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT