Nagar News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीवरून शरद पवार (Sharad Pawar) यांना घेरण्याचा प्रयत्न केला. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकारणासाठी वापर करणाऱ्या स्टंटबाज नेत्याची शरद पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मंत्री विखे यांनी केली आहे.
महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मनुस्मृती पेटवत आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी स्टंटबाजीत महामानवाचा अपमान केला. हा प्रकार संपूर्ण जगाने पाहिला. यावर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आमदार आव्हाड यांनी आंदोलनात केलेली स्टंटबाजी भोवल्यानंतर त्यांनी माफी मागितली. परंतु वेळ निघून गेली होती. आमदार आव्हाड यांच्या या कृतीवर भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जितेंद्र आव्हाड यांना स्टंटबाजी राजकारणी म्हणत, शरद पवार यांना अशा नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "भावनेच्या भरात आपण काय करतो याचे भान राहिले नसलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या अविचारी कृतीने देशभरातील आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू केले आहेत". राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने, अशी कृत्य करून प्रसिध्दी मिळविण्याचा हव्यास करताना आमदार आव्हाड यांना महामानवाची प्रतिमा सुध्दा पुरली नाही, हे अतिशय खेदजनक आहे, असेही मंत्री विखे यांनी म्हटले.
मंत्री विखे यांनी आमदार आव्हाड यांच्या या कृतीवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे देखील लक्ष वेधले. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा निषेध म्हणून त्यांना तातडीने पक्षातून हकालपटी करा, अशी मागणी केली. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे, हे चेहरे सुध्दा आज या घटनेमुळे देशाला समजल्याची टिप्पणी मंत्री विखे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.