Gulabrao Patil, Shivsena
Gulabrao Patil, Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपचे खासदार आमच्यावर टीका करतात, त्यांनी एक मुतारी तरी बांधली का?

Sampat Devgire

जळगाव : भाजपचे खासदार उन्मेष पाटील (BJP MP Unmesh Patil) आमच्यावर टीका करतात. परंतु त्यांनी आतापर्यंत खासदार निधीतुन बांधलेली एक मुतारी तरी दाखवावी. ज्यांनी काहीच केले नाही, ते आमच्यावर काय करतात असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी लगावला.

भडगाव- पाचोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत अभिष्टचिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या खासदारांचा चांगलाच समाचार घेतला. भाजपने काढलेल्या मोर्चा विषयी पालकमंत्री म्हणाले की, भाजपने काल जळगावला मोर्चा काढला. मात्र आम्ही शेतकऱ्यांना रब्बी तसेच अतिवृष्टीची भरपाई मंजूर करून आणली आहे. एक चालू बील भरल्यावर वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे भाजपने कोणत्या विषयावर मोर्चा काढला? असा प्रश्न त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, हे तर मोडलेल्या लग्नाच्या पंगतीत बसण्यासारखे आहे. महाविकास आघाडीने जिल्ह्यात भरमसाठ कामे केली. आता ही रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकर्यासाठी ३५ कोटी तर अतिवृष्टीतच्या नुकसानीची मदत शासनाकडून आणली. एकीकडे शेतकऱ्यांचा कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे दिल्लीच्या सिमेवर बसलेल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करायचे. महाविकास आघाडी सरकारची शेतकऱ्यांविषयी जागल्याची भुमिका आहे. म्हणुनच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदतनिधी वितरीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार उन्मेष पाटील यांचा समाचार घेताना ते म्हणाले, आम्ही दोन वर्षात काय केले? असे भाजप खासदार उन्मेष पाटील विचारतात. परंतु मी त्यांना विचारतो की, खासदार झाल्यावर खासदार निधीतून एक तरी मुतारी बांधली काय? बांधली असेल तर दाखवून द्यावे. त्यांना खासदार म्हणून आपण निवडून दिले आहे. आमदार किशोर पाटील तर तयारच नव्हते पण आपण त्यांना तयार केले आहे. त्यामुळे शिवसेनेवर टीका करताना त्यांनी विचार करावा. आपण नारायण राणे सारख्यांना पुरून उरलो आहोत. त्यामुळे तुम्ही तर माझ्या पुढे कुठेच लागत नाहीत.

पालकमंत्री पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांनी केलेल्या कार्याबाबत त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ते शेतकऱ्यांच्या हीतासाठी कायम आवाज उठवतात. नगरविकास विभागाकडून देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यांनी विकासकामांतून शहराचा विकास साधला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी पाहून मी देखील अवाक झालो.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT