Nashik Kumbh Road Works : कुंभमेळ्याची शहरातील कामे आणि कंत्राटदार याबाबत विरोधकांनी सातत्याने आरोप केले होते. या संदर्भात लोकप्रतिनिधींच्या तक्रारी होत्या. आता थेट भाजपच्या शहराध्यक्षांनीच याबाबत प्रशासनाचे वस्त्रहरण केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे कंत्राटदार कोण? आणि कुठले? याबाबत विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. शहरातील कामांची चौकशी करणाऱ्या सत्ताधारी नगरसेवकांना कंत्राटदारांकडून थेट पोलिसांचा धाक दाखविण्यात आला होता. आता त्यातील गोंधळ पुढे आला आहे.
खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू आणि नागरिकांमध्ये वाढता आक्रोश यामुळे यंत्रणा हल्ली आहे. आता सत्ताधारी भाजप (BJP) नेत्यांनी थेट महापालिका प्रशासन आणि ठेकेदारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
भाजपचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ठेकेदारांनी नाशिक शहराची (Nashik) आणि रस्त्यांची वाट लावली. त्याचा राग नागरिक भाजपचे नगरसेवक आणि आमदारांवर व्यक्त करीत आहेत, असा दावा केदार यांनी केला.
सिंहस्थ ची कामे कोणत्या कंत्राटदारांना दिली याबाबत मूळ कंत्राटदार उपलब्धच नाहीत. या कंत्राटदारांनी उप ठेकेदारांची नियुक्ती केल्याचा गंभीर आरोप केदार यांनी केला. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन दोघांना घरचा आहेर मिळाला आहे.
नाशिक शहरातील निकृष्ट कामांबाबत नगरसेवकांनी विचारणा केली असता त्यांना धमक्या दिल्या जातात. कंत्राटदारांनी कामावर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक ठेवले आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींवर दहशत निर्माण केली जाते.
नाशिक शहरातील आणि महापालिकेची कामे घेण्यासाठी ठराविक ठेकेदारांनी साखळी केली. ज्या ठेकेदाराला काम मंजूर झाले त्याचं नाव मोबाईल नंबर किंवा अन्य माहिती उपलब्ध नाही. यामध्ये नियमांची पायमल्ली झाल्याचा धक्कादायक आरोप सत्ताधारी भाजपच्या नेत्यानेच केल्याने खळबळ उडाली आहे.
हे असतं कुंभमेळा संदर्भात नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपने टास्क फोर्स स्थापन केली आहे. या टास्क फोर्स मध्ये आमदार नगरसेवक तसेच भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदाधिकारी आपापल्या भागात कामांसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकतील. आयुक्त आणि संबंधितांनी दखल न घेतल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.