Girish Mahajan Nashik Roads : ‘राज्यात एवढे वाईट रस्ते कुठेच नाहीत’; गिरीश महाजनांची नाशिकबाबत कबुली, स्टार रेटवरही मोठा निर्णय

Girish Mahajan reverses BJP corporators stand on Nashik contractors' star rate amid pothole controversy : गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंत्राटदार आणि प्रशासनाचे एकमेकांवर आरोप
Girish Mahajan Nashik Roads
Girish Mahajan Nashik RoadsSarkarnama
Published on
Updated on

Nashik pothole issue : राज्यात नसतील एवढे वाईट रस्ते आणि खड्डे नाशिक शहरात आहेत. हे विधान आहे की कबुली यावरून नव्हे राजकारण सुरू झाले आहे. कारण हे विधान चक्क कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे यामुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरला. सत्ताधारी भाजप विरोधात त्यांचेच सहकारी देखील आरोप करू लागले.

राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत थेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर ताशेरे ओढले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. त्यामुळे सबंध यंत्रणा झाडून कामाला लागली.

या पार्श्वभूमीवर अवघ्या काही तासात कुंभमेळा (Kumbh Mela) मंत्री महाजन नाशिकला हजर झाले. शहरातील रस्ते आणि खड्ड्यांची पाहणी केली. महापौर, उपमहापौर आणि महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Girish Mahajan Nashik Roads
Rahul Gandhi FIR Varanasi : संसदेतील आंदोलनानंतर राहुल गांधींसह तीन खासदारांविरोधात वाराणसीत एफआयआर; सनातन धर्माचा अपमान केल्याचा आरोप

यासंदर्भात कंत्राटदारांना स्टार रेट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी यापूर्वी घेतला होता. स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर केला. महासभेत मात्र कंत्राटदारांवर 200 कोटींची खैरात करणाऱ्या प्रस्तावाला भाजपच्या नगरसेवकांनी विरोध करत तो फेटाळला.

Girish Mahajan Nashik Roads
Amit Tiwari Complaint Against CJP : CJP, कपिल सिब्बल अन् अभिजित दिपकेंच्या कुटुंबाविरोधात RTI कार्यकर्त्याच्या तक्रारी; शिक्षणखर्चासह 3 मुद्द्यांवर चौकशीची मागणी

आता मंत्री महाजन यांनीच भाजपच्या नगरसेवकांचा हा निर्णय फिरवला आहे. महापालिकेच्या कंत्राटदारांना स्टार रेट देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपला चांगलीच चपराक बसली आहे.

महापौरांचा कंत्राटदारांना स्टार रेट देण्यास विरोध होता. आयुक्तांचा स्टार रेट देण्यास पाठिंबा होता. त्यात डांबर आणि डिझेलचे दर प्रचंड वाढल्याने हा फरक द्यावा अशी कंत्राटदारांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा मंत्री महाजन यांनी भाजपच्या नगरसेवकांना महापालिकेत सत्ता कोणाची हा एक मेसेज देण्याचा देखील प्रयत्न मानला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com