Girish Mahajan, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan BJP Strategy: गिरीश महाजनांची इनकमिंग पॉलिसी कामी आली; बडगुजर, माजी मंत्री घोलप भाजपमध्ये प्रवेश करणार

Former Shiv Sena Leader Babanrao Gholap Joins BJP: स्थानिक नेत्यांच्या विरोधाला कचऱ्याच्या टोपलीत टाकत भाजप पक्षात आज मेगा प्रवेश सोहळा होत आहे. सुधाकर बडगुजर, बबन घोलप आणि भाजप विरोधातच दंड थोपटणाऱ्या गणेश गीते यांना आज भाजप प्रवेश देणार असल्याचं आज जवळपास निश्चत झालं आहे.

Sampat Devgire

Nashik News, 17 June : स्थानिक नेत्यांच्या विरोधाला कचऱ्याच्या टोपलीत टाकत भाजप पक्षात आज मेगा प्रवेश सोहळा होत आहे. सुधाकर बडगुजर, बबन घोलप आणि भाजप विरोधातच दंड थोपटणाऱ्या गणेश गीते यांना आज भाजप प्रवेश देणार असल्याचं आज जवळपास निश्चत झालं आहे.

नाशिकच्या राजकारणात पक्षाचे पाच आमदार असले तरी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेच सर्वकाही आहेत यावर आज पुन्हा शिक्कामोर्तब होत आहे. स्थानिक आमदारांनी विरोध केलेल्या शिवसेनेचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांचा आज वाजत गाजत भाजप प्रवेश होत आहे. यावेळी अन्य काही माजी नगरसेवक देखील भाजपचा झेंडा हाती घेतील.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही दणका दिला आहे. निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला महापालिका निवडणुकीसाठी फेरमांडणी करावी लागणार आहे. शतप्रतिशत भाजप या धोरणानुसार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रवेशाला संमती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे प्रवेश होत आहेत. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थकांचे शक्ती प्रदर्शन घडविण्याचा चंग बांधला आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज होणाऱ्या प्रवेशात बहुतांशी नेत्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले. उमेदवारी बरोबरच या हेवीवेट नेत्यांकडून महापालिकेच्या मलईदार पदांवरही दावा केला जाणार आहे. त्यामुळे संबंधित प्रभागातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या राजकीय अपेक्षांवर पाणी फिरणार आहे.

भाजपने नाशिक महापालिका निवडणुकीत शंभराहून अधिक जागा जिंकण्याचे जाहीर केले आहे. आज होणाऱ्या प्रवेशांमुळे आगामी काळात आणखी काही प्रवेश होतील असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती एकत्र लढल्यास अन्य पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार हा चर्चेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जळगाव बरोबरच नाशिक जिल्ह्यातही त्यांच्या शिवाय भाजपचे पानही हालत नाही असा संदेश यातून मिळाला आहे. त्यामुळे नाशिकच्या गिरीश महाजन समर्थक उत्साहात आहेत. अनेक गिरीश महाजन समर्थकांना उमेदवारीच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT