Ramdas Athawale On Sharad Pawar : ...तर शरद पवार आज राष्ट्रपती असते! रामदास आठवलेंचा दावा

Union Minister Ramdas Athawale Invites Sharad Pawar to Join BJP Mahayuti During Sangli Visit : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Ramdas Athawale On Sharad Pawar
Ramdas Athawale On Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना महायुतीत येण्याची ऑफर दिली. शरद पवार आज महायुतीत असते, तर ते राष्ट्रपतीपदावर विराजमान असते, असा देखील त्यांनी दावा केला.

"शरद पवार यांनी अजूनही मोदींबरोबर येण्याचा निर्णय घ्यायला हवा. त्यांच्या पक्षाचे बहुतांश आमदार देखील सत्तेत जाण्याचा विचार करत आहेत", असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

महायुतीबरोबर (Mahayuti) असलेले आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय नेते रामदास आठवले सांगलीतील जत दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर यायला हवे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार मोदींबरोबर असते, तर ते राष्ट्रपतीपदावर असते, असे देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, "ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रीय नेते आहेत. देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. अजूनही वेळ गेली नाही. देशहीत डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावे, ही आमच्यासह त्यांच्या पक्षातील आमदारांची इच्छा आहे. यापूर्वी ते महायुतीबरोबर आले असते तर राष्ट्रपती झाले असते".

Ramdas Athawale On Sharad Pawar
Manoj Jarange : 'मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही'; मनोज जरांगेंची आता मराठा आरक्षणासाठी 'आरपार'ची लढाई

'शरद पवार यांनी अजूनही मोदींबरोबर येण्याचा निर्णय घ्यायला हवा. त्यांच्या पक्षाचे बहुतांश आमदार देखील सत्तेत जाण्याचा विचार करत आहेत. पवार यांनी देखील विकासाच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवा', असे मंत्री आठवलेंनी वारंवार म्हटले.

Ramdas Athawale On Sharad Pawar
Ahilyanagar BJP : 'स्थानिक' निवडणुकांमध्ये ताकद दाखणार; भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी एकत्रित प्रेस, मित्रपक्षांसह विरोधकांना सूचक इशारा

राज यांना कायम विरोध राहणार

राज व उद्धव ठाकरे यांच्या एकत्रिकरणाची चर्चा आहे. दोघे एकत्र आले तरी मुंबई महापालिका, राज्यात युतीवर परिणाम होणार नाही. लोकसभेला भाजपने राज यांना बरोबर घेतले होते. त्यांचा कसलाही फायदा ‘एनडीए’ला झाला नाही. राज ठाकरे यांना महायुतीत येण्यास माझ्या पक्षाचा कायमच विरोध होत आणि तो कायम असल्याचा पुनरुच्चार मंत्री आठवले यांनी केला.

महायुतीला आठवलेंचा इशारा

‘महाराष्ट्राच्या सत्तेत आमच्या पक्षावर अन्याय होत आहे. हा अन्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर करावा. माझा पक्ष गरिबांचा असून, येथेही सत्तेत आता वाटा मिळायला हवा. त्यासंदर्भात फडणवीस यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत जागा हव्या आहेत. नाही मिळाल्या तर ताकद दाखवू. स्वबळावर लढू’, असा इशारा मंत्री आठवले यांनी महायुतीला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com