Politics : राज्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत एकमेकांचे राजकीय विरोधकही एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. असंच काहीसं गणित अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ठाकरे गटातील एक फुटीर गट एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि ठाकरे गट समर्थक आहेत. त्यामुळे या अनोख्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे राजकीय विरोधक भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे समर्थक या निवडणुकीत एकत्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कोपरगाव बाजार समितीची निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, कोपरगाव तालुक्यातील बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता बाजी कोण मारणार? हे मात्र, निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
(Ediited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.