Narendra Modi political future Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narendra Modi political future : हे वर्ष मंगळाचे; ...तोपर्यंत देशात ‘मोदीराज’!

Astrologer Pranam Sagar Maharaj Predicts BJP PM Narendra Modi Political Influence in Shrirampur Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं दिगंबर जैन मंदिरात ज्योतिषाचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी भाकीत वर्तवलं.

Pradeep Pendhare

BJP future by astrologer : चालू वर्ष 2025 हे मंगळ ग्रहाच्या प्रभावाखालील वर्ष आहे. त्यामुळे नैसर्गिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये बरेचसे हालचाल, संघर्ष आणि स्थित्यंतर दिसून येतील. विशेषतः देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे आगमन होईल.

राजकीय पटलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव पुढील काळातही दिसून येईल, असे स्पष्ट आणि परखड मत ज्योतिषाचार्य डॉ. प्रणाम सागर महाराज यांनी व्यक्त केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं दिगंबर जैन मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, ॲड. सुहास चुडीवाल, सचिव जितेंद्र कासलीवाल उपस्थित होते. विविध विषयांवर खुलेपणाने संवाद साधताना त्यांनी आपल्या सखोल ज्योतिषीय अभ्यासावर आधारित अनेक भाकिते मांडली.

राजकारणा मागील ग्रहांची गणितं

देशाच्या राजकीय नेतृत्वाविषयी बोलताना महाराज म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाचे सर्वाधिक प्रभावशाली आणि निर्णायक व्यक्तिमत्त्व आहेत. मात्र, त्यांच्या यशामागे केवळ त्यांची लोकप्रियता नाही, तर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे राजकीय गणित, रणनीती आणि दूरदृष्टीही आहे. मोदींचा चेहरा लोकांसमोर असतो, पण अनेक महत्त्वाचे निर्णय मागच्या बाजूने शाह यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात. जोपर्यंत नरेंद्र मोदी हयात आहेत, तोपर्यंत देशात ‘मोदीराज’ सुरूच राहील".

पाकिस्तानबरोबर तणाव...

आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीबाबत महाराजांनी स्पष्ट केले की, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्या असलेला तणाव अजून काहीकाळ टिकून राहणार आहे. मंगळ ग्रहाचे वर्ष असल्यामुळे संघर्ष, उग्र प्रतिक्रियांचा काळ आहे. सीमावर्ती भागात सतर्कतेची आवश्यकता असून, संरक्षण व्यवस्थेने अधिक सजग राहिले पाहिजे".

भाजप भविष्यात स्वबळावर

राज्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना डॉ.प्रणाम सागर महाराज यांनी, सध्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेलं तिनघटकांचं युती सरकार राज्यात आपला कार्यकाळ पूर्ण करेल. प्रशासनात अपेक्षित स्थैर्य येईल. मात्र, पुढील निवडणुकीत भाजपचा एकहाती विजय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप आगामी काळात स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी योग्य पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

खडे घालून भले होतं का?

ज्योतिषशास्त्रात खडे धारण करणे ही एक महत्त्वाची बाब मानली जाते. या संदर्भात बोलताना महाराज म्हणाले, "हातात कोणते खडे घालावेत, हे ज्योतिषशास्त्राच्या नियमांवर आधारित असले तरी, त्याचा परिणाम प्रत्येकासाठी सारखा असेलच, असे नाही. अनेकजण अंधश्रद्धेच्या आधारे खडे घालतात. त्याने काय होईल हे सांगता येत नाही, पण एक गोष्ट नक्की जो खडे विकतो त्याचे मात्र नक्कीच भले होते". एखाद्याच्या हातात कोणता खडा आहे हे पाहून त्याचे त्रास समजण्याची संधी इतरांना मिळते, त्यामुळे अशाप्रकारे आपली कमजोरी उघड करणे टाळावे.

ज्योतिषशास्त्र म्हणजे अंधश्रद्धा नव्हे

ज्योतिषशास्त्र हजारो वर्षांपासून चालत आलेले एक गूढ पण विज्ञानाधिष्ठित शास्त्र आहे. नऊ ग्रह, त्यांचे प्रभाव, नक्षत्रांचे गणित यांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. मात्र, आजकाल काही अघोरी, स्वार्थी लोक चुकीच्या पद्धतीने ज्योतिषशास्त्राचे विकृतीकरण करत आहेत. अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून समाजाने सावध राहावे. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनाचे साधन आहे, अंधश्रद्धेचा प्रचार नव्हे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT