Eknath-shinde-Ajit-Pawar-devendra-Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP, Mahayuti Politics: भाजप निष्ठावंतांपुढे चिंता...ज्यांनी भाजपला केला विरोध, त्यांचाच करावा लागणार प्रचार!

BJP Politics; Shivsena UBT leader belittles BJP loyalists, BJP has to campaign for anti BJP leaders & Candidates-जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आजवर भाजपला टिकेचे लक्ष्य करणाऱ्या भाजप विरोधकांचा जयजयकार करावा लागल्याने वाढणार छुपी नाराजी?

Sampat Devgire

BJP election News: महापालिका प्रभाग रचना आणि जिल्हा परिषद गट, गण रचना जाहीर झाली आहे. त्यामुळे आतासर्वच राजकीय इच्छुकांचे डोळे आता प्रभाग आरक्षणाकडे लागले आहे. सत्ताधारी महायुती याबाबत जोरदार तयारी करीत आहे. मात्र महायुतीत भाजप निष्ठावंतांमध्ये छुपी नाराजी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह महायुतीच्या बहुतांशी नेत्यांनी आगामी निवडणुका महायुतीचे घटक पक्ष एकत्रीत लढणार अशी घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीच्या घटक पक्षांतील इच्छुकांमध्ये घालमेल वाढली आहे. दुसरीकडे निष्ठावंत भाजपच्या नेत्यांना उमेदवारीसाठी सहकारी पक्षाच्या इच्छुकांशी स्पर्धा करावी लागणार असल्याने चिंता आहे.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने पुण्यासह राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जोर लावला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने कल्याण, ठाणे, नवी मुंबई, नाशिकसह विविध शहरी भागात पक्षात इनकमींग वाढविण्यावर भर दिला आहे. या स्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या, उमेदवारीसाठी इच्छुकांचे काय होणार? हा मोठा प्रश्न आहे.

यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात त्यांचा भर भाजपच्या निष्ठावंत नेत्यांच्या नाराजीवर आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत ज्या नेत्यांनी आजवर जाहीरपणे भाजपचे वस्त्रहरण केले, तेच आता भाजपचे सहकारी बनले आहे. ते आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवून देणार आहेत. हा भाजपच्या निष्ठावंतांसाठी चिंतेचा विषय आहे.

राज्याच्या सर्व जिल्ह्यांत हीच स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे मंत्री असल्याने त्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रभाव असेल. याशिवाय चार आमदार याच पक्षाचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असेल. त्यांचा प्रचार भाजपच्या निष्ठावंतांना करावा लागेल.

नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तर जागावाटपापासूनच वादाला सुरवात होईल अशी स्थिती आहे. निवडणुकीआधीच नेत्यांनी परस्परांवर राजकीय हल्ले सुरू केल्याने त्याची जाणीव नेत्यांना झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमश्या पाडवी या भाजप विरोधी नेत्यांचे भाजप नेते माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी अजिबात जमत नाही. त्यामुळे यातून वरीष्ठनेते कसा मार्ग काढणार? हा गंभीर राजकीय पेच आहे.

कोकण आणि मराठवाड्यात ही राजकीय स्थिती अधिक गंभीर आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांत देखील सातत्याने वादाच्या ठिणग्या पडतच असतात. त्यातच सत्तेत सहभागी असलेले शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मान्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेची सुनावणी देखील या निवडणुकीच्या तोंडावरच होण्याची शक्यता आहे. त्यातून कसा मार्ग निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT