Supriya Sule Politics : सुप्रिया सुळेंनी अजितदादांचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना भर सभेत धू धू धुतले, शेवटी म्हणाल्या कान बंद करता का?

Supriya Sule;Have the rulers of Maharashtra ever opened their mouths at Amit Shah or in Delhi on the issues of farmers?-राज्यातील २५ लाख लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी म्हणून वगळली, यावर मंत्रिमंडळात बोलाल का?
Supriya Sule & Narhari Zirwal
Supriya Sule & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची दिंडोरी (नाशिक) येथील सभा चांगलीच गाजली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके मंत्री नरहरी झिरवाळ यांना भर सभेत सुप्रिया सुळे यांचे कान टोचले. जनतेचे कोणते प्रश्न घेऊन दिल्लीत गेला? या शब्दात त्यांनी मंत्री झिरवाळ यांचे हजेरी घेतली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दिंडोरी येथे खासदार सुळे यांच्या उपस्थितीत खेडगाव (दिंडोरी) येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांसह खासदार भास्करराव भगरे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांसह विविध नेते उपस्थित होते. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील या सभेला मोठा जनसामुदाय होता.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हा कार्यक्रम सर्वपक्षीय असायला हवा होता. आम्ही राष्ट्रवादीला वेगळे मानत नाही, अशी मखलाशी करणारे विधान केले. या विधानानंतर मंत्री झिरवाळ यांचा खासदार सुळे यांनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. भर सभेत त्या वारंवार झिरवाळ यांना टोमणे देत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करीत राहिल्या. त्यामुळे उपस्थितांत देखील त्याला तेवढाच उस्फूर्त प्रतिसाद मिळत राहिला.

Supriya Sule & Narhari Zirwal
Supriya Sule Politics: ‘मत चोरी’ प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी दिले निवडणूक आयोगाला आव्हान, म्हणाल्या, पहिली माझी चौकशी करा!

खासदार सुळे आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच मंत्री झिरवाळ यांना म्हणाल्या, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळा पक्ष समजत नाही. आम्ही पण तुम्हाला पक्ष समजत नाही. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सत्याची बाजू सुप्रिया सुळे कधीही सोडणार नाही. अन्याया विरोधात लढणार मात्र कधीही झुकणार नाही.

तुम्ही विकासाचे नाव घेऊन सत्तेत गेल्याचे सांगता. मात्र माझ्या दृष्टीने मेट्रो, रस्ता किंवा अन्य काही कामे उशिरा झाली तरी काही बिघडत नाही. मात्र कॉन्ट्रॅक्टरकडे विमान आले म्हणजे विकास झाला, याला मी विकास मानत नाही. समोर बसलेल्या महिलांच्या हातातील काचेची एखादी तरी बांगडी सोन्याची होईल तेव्हा विकास झाला, असे मी मानते, या शब्दात त्यांनी झिरवाळ यांना फटकारले.

गेली दहा वर्ष भाजप सतत सत्तेत आहे. काही ना काही घोषणा ते सतत करीत राहतात. त्याने जनतेच्या दैनंदिन जीवनात फरक पडेल, असे काही घडले आहे का? कांद्याचा प्रश्न एवढा गंभीर बनला. पडले. त्यावर खासदार भास्कर भगरे आणि मी . गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेले. राज्यात सत्तेत असलेला कोण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अमित शहा यांच्याकडे गेला होता? असा प्रश्न त्यांनी केला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले आहेत, त्याचे अत्यंत गंभीर परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. अगदी पिंपळगाव बसवंत आणि खेडगाव येथील शेतकरी संकटात येणार आहेत. येथील द्राक्ष, डाळींब, कांदा, वाइन काहीही अमेरीकेला जाईल की नाही, अशी शंका आहे. याची तुम्हाला काही कल्पना आहे का? यावर तुम्ही काही बोललात का?. अशी प्रश्नांची सरबत्तीच सुळे यांनी मंत्री झिरवाळ यांच्यावर केली.

शेवटी तर सुळे म्हणाल्या, तुम्ही जरा कान बंद करा. राज्यातील सर्वात मोठा ॲम्बुलन्सचा घोटाळा या सरकारमध्ये झाला आहे. सध्याचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले, असे आम्हाला वाटते. राज्यातील २५ लाख लाडक्या बहिणींची नावे यादीतून वगळली आहेत. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही चर्चा करणार का? असा प्रश्न करून बंडखोर सतत पुढे करत असलेली "विकास" ही ढालच त्यांनी चकणाचूर केली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com