Ram Shinde On Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde On Nilesh Lanke : नीलेश लंकेंची ग्रोथ लोकसभेपुरतीच..; प्रा. राम शिंदेंचं नेता कोण, यावर मोठं भाष्य!

Legislative Council Speaker Ram Shinde Ahilyanagar MP Nilesh Lanke Lok Sabha Assembly elections Maharashtra politics : खासदार नीलेश लंके यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वावर बोलताना विधान परिषद प्रा. राम शिंदे यांनी मोठं निरीक्षण नोदवलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics : भाजपचे आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्या कार्यपद्धतीवर मोठी टिप्पणी केली.

"नीलेश लंके साधं व्यक्तिमत्व लोकांना भावलं, यातून फास्ट ग्रोथ झाली. पण तात्काळ कोसळलं, लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच बालेकिल्ल्यात, त्यांना मत का कमी पडली, हे समजून घेऊन त्याचं त्यांनी विश्लेषण करावं", असा सल्ला प्रा. राम शिंदेंनी नीलेश लंकेंना दिला आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेता कोण, राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhepatil) नीलेश लंके की प्रा. राम शिंदे यावर भाष्य करताना शिंदेंनी मोठी टिप्पणी केली. तत्पूर्वी त्यांनी नीलेश लंके यांची साधं व्यक्तिमत्व आणि कार्यपद्धतीवर मोठं निरीक्षण नोंदवलं.

प्रा. राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, "नीलेश लंके व्यक्तिमत्व जरी साधं वाटत असलं, तरी कार्यपद्धती निश्चित लोकांना चांगली वाटणारी नाही. त्याचं कारण असं आहे की, फास्ट ग्रोथ झाली. पण तात्काळ कोसळलं. सगळ्या लोकांमध्ये सर्वसामान्य म्हणून समोर आले. परंतु ज्यावेळेस स्थानिक लोकांना, त्यांना विधानसभेला मत देण्याची वेळ आली. त्यावेळी मात्र मग त्यांना समजलं की, आपली कार्यपद्धती लोकांना आवडलेली नाही".

नीलेश लंके यांना त्यांच्या कार्यपद्धतीची झलकचा अनुभव लोकसभेला बघितला होता. विधानसभेला जेवढी मतं मिळाली, त्यांना त्यांच्या मतदारसंघात पडली नाही. याचा अर्थ, त्यांनी ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. काय झालं आहे, त्यांनी त्याचं विश्लेषण करावं, असा सल्ला प्रा. राम शिंदेंनी दिला.

अहिल्यानगरचा नेता कोण?

अहिल्यानगरचा नेता कोण? यावर बोलताना प्रा. राम शिंदे यांनी जनता ठरवते. कोण कधी नेता होणार, सध्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत. मी सभापती आहे. लंके खासदार आहेत. जनतेच्या मनात कोण आहे, हे वेळोवेळी ठरत असतं. आता जनता ठरवेल, असे सांगून थेट उत्तर देण्याचं टाळलं.

सुजय विखे की, सत्यजित तांबे

आश्वासक चेहरा म्हणून, सुजय विखे की, सत्यजित तांबे, यावर बोलताना प्रा. राम शिंदे यांनी दोघांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केले. सुजय विखे डायरेक्ट बोलतात, सत्यजित तांबे विचार करून बोलतात, असे निरीक्षण नोंदवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT