Shivsena-MMS News: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा होत आहे. चर्चेने सध्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. हे मनोमिलन झाल्यास नाशिक मधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. त्याला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद आहे. या भूमिकेने राज्यातील राजकारणात एक नवे समीकरण तयार होऊ लागले आहे. यामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गिते यांनी या हालचालींचे स्वागत केले आहे. असे झाल्यास सध्या जे तोडफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला मोठी चपराक बसेल. पैशांच्या जोरावर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना फोडण्याचे पाप काही गद्दार करीत आहेत. त्यांचे भवितव्य संकटात येईल. भाजप घर, कुटूंब आणि पक्षात फूट पाडण्यात यशस्वी झाली. त्याला तो मोठा हादरा असेल, असे सांगितले.
उत्तर महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचा एकही आमदार नाही. मनसेची ही अशीच स्थिती आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये विसंवादाचे सूर दिसून येतात. त्यामुळे मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास हे वातावरण बदलू शकते. विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवली होते. विरोधकांनी त्यावर ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याचा आरोप करून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. अशा परिस्थितीत सध्या स्थानिक स्वराज्य संस्था या एकमेव निवडणुकांमध्ये विरोधकांना संधी आहे.
नाशिक शहरात गेले तीन टर्म भाजपचे आमदार आहेत. सध्या या शहराचे अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत. महायुतीचा घटक असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक तसेच सत्तेच्या माध्यमातून शिवसेना कमकुवत करण्यावर सतत भर दिला आहे. प्रचंड ताकद झोपू नये शिवसेना एकनाथ शिंदेला नाशिक मध्ये नेतृत्व करील असा चेहरा प्राप्त झालेला नाही. भाजपकडे प्रभाव रहावा म्हणून शिंदे यांनी सतत शिवसेनेवर प्रमाण करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
नाशिकमध्ये राज ठाकरे यांना मानणारा मतदारांचा वर्ग आहे. मात्र या पक्षाची संघटनात्मक यंत्रणा प्रभावी नाही. असेना उद्धव ठाकरे यांच्याकडे शहरात विविध प्रमुख नेते आहेत. अनेक पदाधिकारी शिंदे पक्षात निघून गेले आहेत. शिवसेना आणि मनसे या दोघांनाही सूर गवसलेला नाही. ही या दोन्ही पक्षांची सल आहे त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा चांगलाच धक्का घेतला आहे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.