Ram Shinde Jamkhed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde Jamkhed election : 'एमआयडीसी'ला खोडा, ठाकरेंच्या शिलेदारांनी टायमिंग साधलं; हेडमास्तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांच्या ताफ्यासमोर जोरदार राडा

Shiv Sena UBT Workers Protest During Devendra Fadnavis Jamkhed Election Rally : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेड नगरपालिकेच्या प्रचारसभेसाठी आले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

Pradeep Pendhare

Jamkhed municipal election news : राज्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होत असून, आज रात्र वाजता प्रचाराची सांगता झाली. प्रचाराच्या सांगतेनिमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला. प्रमुख नेत्यांनी प्रचार सभा घेत, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

तोच काही ठिकाणी राजकीय राडा देखील झाला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघातील जामखेड नगरपालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला समोरं जाव लावलं. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला.

जामखेड इथं प्रचार सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अन् विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वाहनांचा ताफा चालला होता. त्याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याला प्रलंबित कामाचे फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मयूर डोके यांच्यासमवेत त्यांच्या सहकाऱ्यांनी ही निदर्शने केली.

शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या या निदर्शनांमुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मयूर डोके यांच्यासह निदर्शन करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत या पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं होते. पोलिसांनी तशी नोंद घेतली होती. परंतु तालुकाप्रमुख मयूर डोके यांनी निदर्शनामागची भूमिका सांगताना, भाजपच्या कपटी राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला.

मयूर डोके म्हणाले, "आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडसाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. पण तिला खोडा घालण्यात आला. याचा आम्ही जाब विचारला. दोन्ही तालु्क्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. तसंच तालुक्यातील धर्मस्थळासाठी मोठा निधी मंजूर झाला होता. त्या निधाला देखील कटकारस्थान करून भाजपने रोखला. धर्मस्थळांची सबलीकरण हा भाजपचा अजेंडा आहे."

हेडमास्तर शिंदेंचा मी विद्यार्थी

देवेंद्र फडणवीस यांनी सभेतील भाषणात, 'प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. कारण ते आमचे हेडमास्तर आहे आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे. त्यांचा आदेश मला क्रमप्राप्त आहे. आणि मी राम शिंदेंच्या पाठीशी कायम उभा आहे. जामखेडकरांनी उद्याच्या दिवस कमळाची काळजी घ्यावी पुढील पाच वर्षे जामखेडच्या विकासाची काळजी मी घेईल,' असे म्हटलं.

विधानसभेला पोस्टल मतांमध्ये घात झाला

'विधानसभेला पोस्टल मतांमध्ये आपला किल्ला गेला. ती चूक पुन्हा या निवडणुकीत नको. आम्ही निव्वळ आश्वासन देवून जाणारे नेते नाहीत. त्यामुळे रामभाऊ तुम्ही जामखेडच्या विकासाचा निर्धार करा. ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. तुमच्या ज्या-ज्या मागण्या आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची हमी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपली आहे. लोकशाहीने मतांच्या पेटीतून राजा करण्याची ताकद दिली आहे. राणीच्या पोटातून राजा निर्माण होणार नाही,' असे ठासून सांगताना फडणवीस यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.

राम शिंदेंनी पुन्हा बोलून दाखवली खंत

सभापती प्रा. राम शिंदे यांनी, प्रांजल चिंतामणी माझ्या पेक्षा जास्त नशीबवान आहेत. त्यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री स्वता: व्यस्त कार्यक्रमातून आले. हीच वेळ माझ्या विधानसभा निवडणुकीत आली असती, तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो. मात्र आपण कर्जत-जामखेडच्या मतदारांचा कधीच अपमान होऊ दिला नाही. पराभव झाला असला, तरी मला विधान परिषदेच्या सभापती विराजमान केले, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT