Jayant Patil, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपची इच्छा आहे; पण थोडीशी लाजते आहे!

सध्याच्या राजकीय वातावरण पाहता भाजपची इच्छा आहे; पण थोडीशी लाजते आहे.

Sampat Devgire

नाशिक : भाजप- मनसे युतीवर बोलताना, (BJP-MNS Alliance) भाजप मोकळेपणाने राज ठाकरेंसोबत युती करताना दिसत नाही. (They are not looking with open heart to Shake hand with Rak Thakre) भाजपची इच्छा आहे; (BJP Wish but shy) पण थोडीशी लाजते आहे, असे स्पष्ट करत त्यांना मनसेच्या मतदानाची काळजी असल्याचा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी मारला.

श्री. पाटील सध्याविधानसभा मतदारसंघ निहाय आढावा दौरा करीत आहेत.त्यासाठी ते येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, सत्तेत असलो तरी आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या! त्यामुळे पक्षाची ताकद वाढवावी लागेल. त्यासाठी पक्षाचे काम जनतेपर्यंत घेऊन जा. केंद्राच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करा, छगन भुजबळ साहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम पक्षाने केले असून पक्ष त्यांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभा आहे.

ते म्हणाले, राज्यात अतिवृष्टी झाली असून पिकांचे पंचनामे करूनच मदत दिली जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. या मतदारसंघात भुजबळ साहेबांनी प्रचंड विकास कामे केले असून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा ऐतिहासिक प्रकल्प भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे साकारला आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आवश्यक त्या गोष्टी केल्या असून निधीही दिला आहे. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही असेही गौरवोद्गार पाटील यांनी काढले.

Jayant Patil NCP

ओबीसी आरक्षण वाचविण्यात यश

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळाच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. त्यांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले आहे असे स्पष्ट करत लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होत आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेचे आज येथे आगमन झाले. येथील यश पॅलेसमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या परिवार संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. सहकार नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पगार, युवा नेते जयदत्त होळकर, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, शहराध्यक्ष दीपक लोणारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, सामाजिक न्यायविभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकबर शहा, भुजबळ संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, महिला तालुकाध्यक्षा सोनाली कोटमे, युवक तालुकाध्यक्ष मोहन शेलार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT