देश सोडलेल्या परमवीरसिंगवर केंद्रीय यंत्रणा विश्वास कसा ठेवतात?

नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय दौरा आज येवला येथून सुरु झाला. यासंदर्भात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला.
Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCPSarkarnama

नाशिक : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex Home minister Anil Deshmukh) यांच्या मागे भाजपची सगळी यंत्रणा (Bjp`s whole machinery act on Anil Deshmukh) लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग (Parambeer Singh Abscond) देश सोडून पळून गेले आहेत. (He leave country) त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? (Centre agencies) असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी केला.

Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCPSarkarnama

श्री. पाटील यांचा नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय दौरा आज येवला येथून सुरु झाला. यासंदर्भात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे. हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे.

Jayant Patil, NCP
छगन भुजबळांवर ताणलेली बंदूक कोणाची? शिवसेनेची की राष्ट्रवादीची?

श्री. पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत चांगले काम झाले आहे. त्यांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले आहे. भुजबळांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. ते अफाट काम करीत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं.

Jayant Patil, NCP
देविदास पिंगळे यशस्वी; बाजार समिती निवडणुकीचा मार्ग खुला

श्री. पाटील यांनी कार्यकर्त्यांनी सक्रीय होण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ही सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचली तरच आपले संघटन मजबूत होईल. आपल्या पक्षाचे केवळ ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे. बुथ कमिट्यांचे काम सक्षमपणे करा त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करू.

ते म्हणाले, मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळसाहेबांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

यावेळी आलेल्या अभिप्रायांचे त्यांनी वाचन केले. संवाद परिवार संवाद यात्रा नवव्या दिवशी नाशिक जिल्हयात दाखल झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खवटे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, बाळासाहेब लोखंडे, सोनाली कोथमे, मोहन शेलार उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com