Keshav Upadhey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Vs Shivsena : टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्यांनी शिवसेनेची वाट लावली!

Sampat Devgire

Maharashtra Politics : ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीत स्थान मिळालेल्या नेत्यांवर जर गैरव्यवहाराचे आरोप असतील, तर ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावरील कारवाई थांबलेली नाही. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना महाविकास आघाडी सरकारने ‘क्लीन चीट’ दिली होती. त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. (Those who joins BJP means they didn`t got clean cheat from Government)

भाजपचे (BJP) प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसचे (Congress) खासदार धीरज साहू यांच्या घरात दोनशे कोटी सापडले. त्यातील किती हिस्सा काँग्रेस नेत्यांना जात असेल, असा प्रश्न केला. शिवसेनेच्या (Shivsena) ज्या नेत्यावंर आरोप आहेत, त्यांना क्लीन चीट दिलेली नाही, असा दावा केला.

श्री. उपाध्ये म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केलेल्या टिकेला उत्तर देताना उपाध्ये म्हणाले, की राऊत यांनी नैतिकतेचा उल्लेख करू नये. पत्राचाळमध्ये अनेक मराठी लोकांचेही नुकसान झाले. टिपू सुलतानचे कौतुक करणाऱ्यांनी शिवसेनेची वाट लावली, असा टोमणा त्यांनी मारला.

जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार, त्यामुळे भ्रष्टाचार ही काँग्रेसची गॅरंटी हे समीकरण झालं आहे; तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही ‘मोदी की गॅरंटी’ आहे, असा घणाघात उपाध्ये यांनी केला.

श्री. उपाध्ये म्हणाले, की झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरात सुमारे २०० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. यावरून काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि गांधी परिवाराकडे किती संपत्ती असेल, याचा हिशेब जनतेने करावा. काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच; तर त्याचे नाव ‘गांधी करप्शन सेंटर’ असे ठेवावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT