Maratha Reservation: हुतात्मा स्मारकात गोमूत्र शिंपडले तेव्हा छगन भुजबळ कोण होते?

Maratha Reservation issue, Dr. Sujeet Gunjal Questined Chhagan Bhujbal-डॉ. सुजीत गुंजाळ यांचे छगन भुजबळ यांच्या इंदापूरच्या सभेतील वक्तव्याला सणसणीत उत्तर
Dr. Sujeet Gunjal & Chhagan Bhujbal
Dr. Sujeet Gunjal & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maratha Vs Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी इंदापूर येथे ओबीसी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपण क्षुद्र असल्यानेच येवल्यात रस्त्यावर गोमूत्र शिंपडल्याचा आरोप केला होता. (Yeola Constituency Maratha Reservation Follower criticized Minister Bhujbal)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी इंदापूर (Pune) येथे भाजपच्या (BJP) ओबीसी नेत्यांसह मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांवर देखील आरोप केला.

Dr. Sujeet Gunjal & Chhagan Bhujbal
Satara Mahavikas Aghadi News : निधीच्या आकड्यांतून 'महायुती' करतेय जनतेची फसवणूक : शशिकांत शिंदेंचा घाणाघात

मंत्री भुजबळ यांच्या इंदापूर येथील सभेतील आरोपांना येवल्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी अतिशय सणसणीत उत्तर दिले आहे. भुजबळ यांनी क्षुद्र शब्दाचा उल्लेख केला. त्याबाबत येथील डॉ. सुजीत गुंजाळ यांनी नाराजी व्यक्त केली. श्री. भुजबळ राज्याचे मंत्री आहेत. मात्र सध्या ते सुडाने पेटले असल्याने आपण काय बोलतो याचा त्यांना विसर पडत असावा, असे ते म्हणाले.

छगन भुजबळ १९८५ मध्ये मुंबई शहराचे महापौर असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदूईजमया पुस्तकाच्या समर्थनार्थ हुतात्मा स्मारकावर मोर्चा आला होता. तेव्हा भुजबळ यांनी गोमूत्र शिंपडून हुतात्मा स्मारकाची सफाई केली होती. तेव्हा भुजबळ कोण होते आणि मोर्चा काढणारे समाजबांधव कोण होते? असा प्रश्न डॉ. गुंजाळ यांनी केला आहे.

श्री. भुजबळ केवळ राजकीय हेतूने ओबीसी समाजाचे मेळावे घेत आहेत. त्यांचे मुठभर समर्थक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम चालवतता. वस्तुतः मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला राजकीय नेते वगळता सगळ्यांचाच पाठींबा आहे. आमच्या तालुक्यात व गावात आम्ही सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतो. आमच्यात कोणताही वाद नाही. भुजबळ यांनी कितीही प्रयत्न केला तरीही, गावात मराठा आणि अन्य समाज भावा भावा सारखेच असल्याचा पुनरूच्चार गुंजाळ यांनी केला.

Dr. Sujeet Gunjal & Chhagan Bhujbal
Solapur News: 'भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम' फेसबूक पोस्टकरून पोलिसाने स्वत:वरच झाडल्या तीन गोळ्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com