Vivek Kolhe and Snehalata Kolhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Snehalata Kolhe News : कोल्हेंच्या मनधरणीसाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू ; यादव अन् फडणवीसांसमोर आव्हान

BJP and Kopargaon Politics : ..त्यामुळे कोपरगावमधील राजकीय घडामोडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे..

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : कोपरगावमधील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पेच सोडवण्यासाठी भाजप दिल्लीतून सूत्र हलवले जावू लागलेत. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मनधरणीसाठी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते.

2019च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील अंतर्गत कुरघोड्यातून स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 450 मतांनी विजय निसटला. यानंतर स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी राजकीय मैदानात एन्ट्री घेतली आणि त्यांनी थेट भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्याशी राजकीय संघर्ष सुरू केला.

या संघर्षाला काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं बळ घेतलं. यातून विखेंविरुद्धचा कोल्हे यांचा राजकीय संघर्ष तीव्र होत गेला, अन् जिल्ह्यात राजकीय ताकद निर्माण केली. हीच ताकद आता भाजपला पुन्हा हवी आहे. त्यासाठी भाजपकडून स्नेहलता कोल्हे यांची वेगवेगळ्या माध्यमातून मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कोपरगावमधील राजकीय घडामोडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महायुतीच्या सत्तेत अजित पवार त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस(Congress) पक्ष घेऊन आले. त्यामुळे कोपरगावमधील महायुतीची राजकीय गणिते विस्कटलीत. लोकसभेला त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसल्याचे दिसूनआले . तोच फटका विधानसभेला बसू नये यासाठी आता भाजप प्रयत्न करत आहेत. युवा नेते विवेक कोल्हे यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेसाठी शड्डू ठोकला. त्याअनुषंगाने पावले देखील पडली आहेत. ही वेगाने पडणारी पावलं शरद पवार यांनी देखील ओळखतील.

विवेक कोल्हे यांची ही पावलं आता कोपरगावात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांना राजकीय धक्का देतील, संघर्ष करतील, अन् त्यांचा विरोधकांना फायदा होईल, हे ओळखून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सावध झाली. विवेक कोल्हे यांना रोखण्यासाठी त्यांच्या मातोश्री माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची मनधरणी केली जात आहे.

विधानसभाचा धुरळा उडला आहे. विवेक कोल्हे कधीही, केव्हाही, कोणताही निर्णयावर येतील. हेच लक्षात घेऊन, भाजपने(BJP) त्यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांच्याशी दिल्लीतून संपर्क साधला आहे. केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी कोल्हे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत नेमकं काय राजकीय गणित शिजली हे मात्र कळू शकले नाही. या चर्चेला भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील साक्षीदार होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT