NCP Vs Congress in Kolhapur : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये चाललेली रस्सीखेच आता एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपापर्यंत येऊन पोहोचली आहे. ठाकरे गटाने मतदार संघावर दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षही आक्रमक झाला आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आज(शनिवार) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस(Congress) नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत, काँग्रेस आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला नाही दिला, तर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात आम्ही तयारी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष व्हीव्ही पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
कोल्हापूर(Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघावरून जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट काँग्रेसवर आरोप केले आहेत. लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारात एक संघ असलेले तीन पक्ष उत्तर मतदारसंघावरून एकमेकांच्या विरोधात उभा ठाकले आहेत. शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाने मेळावा घेत उत्तर कोल्हापूरच्या जागेची मागणी केली होती. आता राष्ट्रवादी शरद पवार गट देखील उत्तर कोल्हापूरच्या जागेवरून आक्रमक झाला आहे.
कोल्हापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटातील जिल्हाध्यक्ष व्ही बी यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला नाही मिळाला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात राष्ट्रवादीचे(NCP) उमेदवार उभे करू अशी घोषणाच व्ही बी पाटील यांनी केली आहे. यावेळी आमदार सतेज पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. काँग्रेसकडून आमची मुस्कटदाबी होत आहे. असंही ते म्हणाले.
लोकसभेला शाहू महाराज यांना आम्ही निवडून दिले पण केवळ ते काँग्रेसचे खासदार असल्यासारखी वागणूक मिळत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाला लोकसभेच्या दोन्ही जागा दिल्या. आमची चार जागांची मागणी असताना केवळ दोन जागा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला उत्तर मतदार संघ द्या, नाही जमले तर दक्षिण द्या. काँग्रेसने मोठे मन दाखवून उत्तर मतदार संघ द्यावा. मतदार संघ दिला नाही तर मैत्रीपूर्ण लढत करू व्ही बी पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, पाटील यांनी दिला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.