Anjali Damaniya
Anjali Damaniya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`अजितदादांशी हात मिळवला तेव्हा फडणविसांनी घोटाळ्याच्या फाईल बंद केल्या आणि आता...

Sampat Devgire

मुंबई : भाजपचे (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना रिटायरमेंट प्लॅन देऊन मोहीत कंबोज (Mohit Kamboj) हा दुसरा किरीट सोमय्या उभा करण्यासाठी हे सुरु असावे. भाजप या घोटाळ्यांचा उपयोग त्यांच्या राजकारणासाठी करीत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारणाचा हा खेळ थांबावावा व खरी चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया (Anjali Damania) यांनी सांगितले.

मोहीत कंबोज यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणारे ट्वीट केल्याने आज अचानक ते चर्चेत आले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रीया दिली.

त्या म्हणाल्या, यापूर्वी किरीट सोमय्या असे बोलायचे. मात्र बहुतेक त्यांना रिटायरमेंट प्लॅन देऊन दुसरा किरीट सोमय्या उभा करण्यासाठी हे सुरु असावे. मला त्यांना विचारायचे आहे की, सिंचन घोटाळ्यात काय झाले? याबाबत तुम्हाला काय माहिती आहे. आजवर या विषयावर अनेक कार्यकर्ते लढले. अक्षरशः वेड्यासारखे लढले. तुम्ही राजकारण कराव म्हणून काय? आम्ही लढायचो तेव्हा वाटायचे, भ्रष्टाचार बंद व्हावा. मात्र आत्ताच्या घडीला काय होते आहे, हवी तेव्हा फाईल उघडली जाते. नको तेव्हा ती बंद केली जाते. म्हणजे भाजपमध्ये घेण्यासाठी लोकं हवी असतात, तेव्हा फाईल्स उघडल्या जातात. त्यांना त्रास दिला जातो व ताबडतोब ते पक्षात आल्यावर ती फाईल बंद होते.

त्या म्हणाल्या, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करायचे होते, तेव्हा त्या सर्व सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स बंद केल्या होत्या. अतिशय संताप आला होता की, हे लोक काय करत आहेत. महाराष्ट्राचा ज्यांनी विनाश केला, ७२ हजार कोटींचा जो घोटाळा होता, त्या लोकांबाबत तुम्ही हातमिळवणी करून तो घोटाळा बंद केला. सरकार बनवायला कोणी कोणाबरोबर जावे याच्याशी आम्हाला काही देण, घेण नाही. सिंचन घोटाळ्याची जी चौकशी बंद करण्यात आली. आता ते विरोधी पक्षनेते झालात, तेव्हा पुन्हा चौकशी करीत आहात, हा सर्व तमाशा केला आहे.

कंबोज असे म्हणाले की, माझा स्ट्राईक रेट चागंला आहे. अनिल देशमुख, नवाब मलीक अशा अनेकांना माझ्यामुळे जावं लागलं. याविषयी विचारले असता, दमानीया म्हणाल्या, त्यात मी एक अॅड करू इच्छीते. ते माध्यमांसमोर असे म्हणाले होते ३० जून तुमचा असेल आणि १ जुलै आमचा असेल. म्हणजे एखाद्या पोलिस आयुक्तांविषयी ही व्यक्ती बोलते, आणि खरंच पांडे रिटायर झाल्यावर त्यांना अटक होते. काय तमाशा आहे. खरोखरच राजकारण हा एक खेळ करून ठेवला आहे. याबाबत मला अतिशय दुःख होते की, कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या विरोधात बोलण्याचा काही हक्कच नाही का? जराही काही बोललं तर तुम्ही त्यांच्या विरोधात कारवाई करणार. क्लेषकारक आहे.

हा सुड उगवण्याचा प्रयत्न आहे काय? यावर त्या म्हणाल्या, जे झालं ते चुकीचे आहे, असे आपण म्हणू शकत नाही. कारण भ्रष्ट ते होतेच. त्यांच्यावर तसे आरोप होते. मात्र कारवाई होत नव्हती. ती कारवाई यांना सोईची वाटेल तेव्हा होते. हा मुद्दा त्यात सर्वात महत्त्वाचा आहे. कारण भ्रष्ट लोक सर्व पक्षांत आहेत. नव्वद टक्के लोक भ्रष्ट आहेत. मात्र दुःख याचे की, फाईल्स सोयीच्या वेळी उघडल्या जातात व हव्या तेव्हा बंद होतात.

कोणताही घोटाळा तडीस जात नाही. आता पुन्हा सिंचन घोटाळा उघड झाला तर झालाच पाहिजे. फक्त त्यात शिक्षा झाली पाहिजे. त्याचा राजकीय उपयोग नाही झाला पाहिजे.

असा आहे सिंचन घोटाळ...

कोणतेही धरण व्हावे लोकांची मागणी असते. त्यावर लोकप्रतिनिधी पत्र देतात. मात्र या प्रकरणात रॅंडमली ही धरणं उभी करण्यात आली. अनेक धरणाचा काहीही उपयोग झाला नाही. त्या धरणांना कालवे बांधले नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग झाली. सुरवातीला त्याच्या निविदा अतिशय अल्प किमतीची होती. शासनाने मान्यता मिळाली की, त्या किमती प्रचंड वाढत होत्या. कोंढाणा धरण ५६ कोटींचे होते, ते ६०० कोटींपर्यंत पोहोचले. बाळगंगा धरण हजार कोटींच्या वर गेले. कंत्राटदार एकच. निविदा झाल्या झाल्या त्या बँक खात्यात जमा होत असे. व त्यातून रोख पैसे काढण्यात आले. ते लोकांना कधी कळलेच नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT