Vaibhav Pichad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vaibhav Pichad : 'तिकीट मिळो न मिळो, विधानसभा लढायचीच'; पिचड कार्यकर्त्यांचा निर्धाराने लहामटे अस्वस्थ

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अकोले विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुस्ती रंगणार आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी आमदार वैभव पिडच यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामुळे कोंडी झाली आहे. अजितदादा गटाचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्यामुळे वैभव पिचड यांची कोंडी झाली आहे.

अजितदादांनी देखील अकोले मतदारसंघावर दावा कायम ठेवल्याने वैभव पिचड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून तिकीट मिळो न मिळो, पण विधानसभा लढवायचीच, असा आग्रह वैभव पिचड यांच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे अकोल विधानसभा मतदारसंघात महायुती तुटणार, असे दिसते.

भाजपचे (BJP) माजी आमदार वैभव पिचड यांनी संवाद दौरा सुरू केला आहे. यात सर्वसामान्यांच्या गाठीभेटीसह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यातून पुढे संवाद मेळावा झाला. यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी चूक सुधारायची आहे. पुन्हा तुम्हाला आमदार करायचे आहे. माजी मंत्री ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी तालुक्यात भरपूर विकास कामे केली आहे. ती पुन्हा सुरू होताना पाहायची आहेत. यावेळी तुम्हाला पक्षाकडून तिकीट मिळो न मिळो, पण विधानसभा लढायचीच, असा आग्रहक कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांच्याकडे केला.

माजी आमदार वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साह पाहून महायुती असलेल्या मित्रपक्षाच्या आमदारांवर सडकून टीका केली. 'आमदारकी मिळवण्यापूर्वी विद्यमान आमदारांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर राष्ट्रवादी (NCP) केले. पक्ष फुटला, तर शरद पवारांची साथ सोडून अजितदादांकडे आले. विकासाच्या नावाखाली त्यांनी फक्त पक्षांची गद्दार केली. या पाच वर्षांत आमदारांनी कोणते विकासकाम पूर्ण केले, त्याचा तालुक्याला फायदा झाला. महायुती सरकारने विकास निधी दिला, त्यांचा वाटा नाही का?', असा सवाल वैभव पिचड यांनी केला.

अतिवृष्टीमुळे आदिवसी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे आदिवासी दिन नको तिथे साजरे होत आहे. आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सर्वव्यापी भूमिका घेताना आमदार दिसलेच नाहीत, असेही देखील वैभव पिचड यांनी म्हटले.

वैभव पिचड यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थित घेतलेली आक्रमक भूमिका महायुतीत अकोल्यात तडे जाणार असे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघावर पूर्वीच दावा केला आहे. अजितदादांच्या या भूमिकेमुळे महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांची कोंडी झाली आहे. वैभव पिचड यांनी ही राजकीय कोंडी फोडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुढाकार घेतला. तसंच ते मतदारसंघात देखील सक्रिय झाले आहेत.

वैभव पिचड यांच्या झंझावातामुळे आमदार किरण लहामटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आमदार लहामटे यांनी देखील सावध भूमिका घेत मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. महायुतीमधील दोघा मित्रपक्षांच्या आजी-माजी आमदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे अकोले मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT