BJP Nasik Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Nasik Politics: भाजप आजमावणार ताकद, ३३ वर्षानंतर देणार नाशिकमध्ये उमेदवार!

BJP Vs Shivsena Eknath Shinde News: कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपने सुरू केली नाशिक मतदार संघात निवडणुकीची तयारी

Sampat Devgire

Nasik News: गेली दोन वर्ष लोकसभेसाठी जोर बैठका मारणाऱ्या भाजपने अखेर नाशिकमध्ये निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपची ही तयारी सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण करीत आहे. (BJP Vs Shivsena Eknath Shinde News)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोठी तयारी केली आहे. बूथप्रमुखांपासून तर विविध प्रचार समित्यांद्वारे संपर्क देखील सुरू केलेला आहे. तीन ते चार उमेदवार निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. या सर्व राजकीय उपक्रमातून भाजपने जाणीवपूर्वक वाढविलेली ताकद आता पक्षाने प्रत्यक्ष अजमावण्याचा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या नाशिक,धुळे आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख म्हणून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रमुख केदा आहेर यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वतः विखे पाटील भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीचे सदस्य असल्याने इच्छुक उमेदवारांनी देखील नाशिक मतदारसंघात गांभीर्याने निवडणुकीची तयारी केली आहे.

मतदार संघात तीन आमदार

नाशिक मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले असे तीन आमदार आहेत. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे आणि सिन्नरचे माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत. सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. मतदारसंघात भाजपने विविध महत्त्वाच्या संस्थांवर आपल्या नेत्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून भाजपने गांभीर्याने निवडणुकीचा विचार सुरू केला आहे. या संदर्भात महसूल मंत्री विखे पाटील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून हा प्रस्ताव देणार आहे.

३३ वर्षांनी भाजपचे चिन्ह

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती असल्याने या युतीने पहिली निवडणूक 1989 मध्ये लढवली होती. त्यात डॉ. डी. एस. आहेर खासदार झाले होते. डॉ. आहेर यांचा शायनिंग इंडिया कॅम्पेन असताना १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. वसंतराव पवार यांनी पराभव केला होता. त्यानंतर १९९६ पासून २०१९ पर्यंत युतीकडून शिवसेनेने येथे उमेदवार दिला होता. गेल्या दहा वर्षापासून येथे शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. थोडक्यात ३३ वर्षांपासून लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघात भाजपचा उमेदवार आणि चिन्ह नाही. त्यामुळे भाजपने हा निर्णय घेतल्यास ३३ वर्षानी भाजप या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे.

शिंदे गटाची नाराजी

भाजपचा हा निर्णय महायुतीच्या सहकारी पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा ठरू शकतो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना पक्षाने उमेदवारीसाठी कमिटमेंट दिलेली आहे दुसरीकडे अजित पवार गटाकडून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या नावाची चर्चा आहे त्यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे अशा स्थितीत भाजप ही जागा तडजोड म्हणून लढविणार असल्यास त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याची मोठी उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT