Sharad Pawar News: केशवसुतांची 'तुतारी' अन् शरद पवारांचे अनोखं नातं तुम्हाला माहीत आहे का?

Sharad Pawar launches party new symbol from Raigad: केशवसुत यांची 'एक तुतारी द्या मज आणुनी फुके न मी ती स्वा प्राणाने' ही कविता अजरामर आहे. याचं केशवसुत कट्यावर तुतारी देखील मोठ्या डौलाने उभी आहे.
Sharad Pawar launches party new symbol from Raigad
Sharad Pawar launches party new symbol from RaigadSarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे. 'तुतारी' चिन्हांचे शरद पवार यांच्या हस्ते रायगडावर अनावर करण्यात आले. तुतारीचं अन् शरद पवारांचे एक अनोखं नातं सिंधुदुर्गातील सावंतवाडीत जोडलेलं आहे. (Sharad Pawar launches party new symbol from Raigad)

सावंतवाडीच्या सौंदर्यांत भर टाकणाऱ्या मोती तलावाच्या मधोमध केशवसुत कट्टा आहे. कविवर्य केशवसुत यांची 'एक तुतारी द्या मज आणुनी फुके न मी ती स्वा प्राणाने' ही कविता अजरामर आहे. याचं केशवसुत कट्यावर तुतारी देखील मोठ्या डौलाने उभी आहे. या स्मारकाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलं होते. आज तीच तुतारी राष्ट्रवादी काँगेसची निशाणी झाली आहे. यानिमित्ताने जुन्या आठवणींना सावंतवाडीकरांनी उजाळा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या नव्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह दिले. या चिन्हाचे रायगडावर काल अनावरण करण्यात आले. स्वतः शरद पवार यांनी रायगडावर जाऊन पक्षाच्या नव्या चिन्हाचे अनावरण केले आहे. यावेळी रायगडावर पक्षातील सर्व वरिष्ठ नेते आणि इतर मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharad Pawar launches party new symbol from Raigad
Anil Patil On Uddhav Thackeray: किती दिवस वडिलांच्या जिवावर मते मागणार? अनिल पाटलांचा ठाकरेंना सवाल

यापूर्वी शरद पवार गटाने पक्षाचे नवे चिन्ह म्हणून वटवृक्षाची मागणी केली होती. परंतु आयोगाकडून शरद पवार गटाला हे चिन्ह देण्यात आले नाही. याउलट तुतारी फुंकणारा माणूस असे नवे चिन्ह आयोगाने जाहीर केले. आता याच नवीन चिन्हाला आणि पक्षाच्या नवीन नावाला घेऊन शरद पवार आगामी निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत.

Sawantwadi
Sawantwadi Sarkarnama

'तुतारी'च्या अनावरणानंतर शरद पवार काय म्हणाले...

"आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अखंड राहील, असा आहे. देशात वेगळी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. सत्ता सामान्यांसाठी वापरण्याऐवजी राज्यांत आणि भाषेत अंतर वाढवण्याचं काम केलं जातं. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक संघर्ष आहे."

"देवगिरीत यादवांचं राज्य होतं... दिल्लीत मोघलाचं राज्य होतं.... पण शिवछत्रपतींचं राज्य सामान्यांची सेवा करणारे, रयतेचे आणि हिंदवी स्वराज्य होते. महाराष्ट्राची स्थिती बदलून जनतेचं राज्य आणावं लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ही संघटना मजबूत करायची आहे. निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह दिलं आहे. ही तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. तुमच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून यश मिळेल,"

एक तुतारी द्या मज आणुनि

एक तुतारी द्या मज आणुनि

फुंकीन मी जी स्वप्राणाने

भेदुनि टाकीन सगळी गगनें

दीर्ध जिच्या त्या किंकाळीने

अशी तुतारी द्या मजला आणुनी

कवी - केशवसुत

Sharad Pawar launches party new symbol from Raigad
Jitendra Awhad : आव्हाडांनी पेललं मिटकरींचं आव्हान, 1 लाख बक्षीस देणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com