Keda Aher, BJP
Keda Aher, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा परिषदेची निवडणुक भाजप स्वबळावर लढणार!

Sampat Devgire

येवला : आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. मायक्रो प्लॅन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येक घरापर्यंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवावा. निवडणुकीत भाजपा (BJP) स्वबळावर लढणार आहे. येवला (Yeola) शहर जनसंघाचा बालेकिल्ला असून येथील जनता सुज्ञ आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेने भाजपाचा नगराध्यक्ष निवडून दिलेला असून पुन्हा आपलीच सत्ता येणार असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी व्यक्त केला.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शहर मंडलाची संघटनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा सरचिटणीस सुनील बच्छाव उपस्थित होते.

श्री. अनासपुरे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सात वर्षातील कारकिर्दीत जनसामान्यांच्या कल्याणाकरीता विविध योजना सुरू करण्यात आल्या असून या योजनांचा कार्यकर्त्यांनी सूक्ष्म अभ्यास करून आपल्या शहरातील नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. येथे निवडणुकीत आपले यश निश्चित असून आपण स्वबळावर लढणार असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत मी स्वतः लक्ष घालून योग्य उमेदवारांना तिकीट वाटप करणार असल्याचे आहेर यांनी सांगितले.

बैठकीला नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, सरचिटणीस राधेश्याम परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, मर्चंट बँकेचे संचालक मनोज दिवटे, राजू परदेशी, कुणाल भावसार, पंकज पहिलवान, सुनील बाबर, दिनेश परदेशी, बाबूसेठ खानापुरे, महिला मोर्चा अध्यक्षा अनुपमा मढे, लिलाताई पेटकर, महेश वडे, भूषण भावसार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा येवला तालुक्याची बैठक अंदरसूल येथे पार पडली. रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, प्रा. सुनील बच्छाव, ग्रामीण मंडल प्रभारी आनंद शिंदे, नगरसेवक प्रमोद सस्कर, राजूसिंग परदेशी, गोरखनाथ खैरनार आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT