पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य म्हणजे, चोरांच्या उलट्या बोंबा!

नाशिकमध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी व आंदोलन
Congress agitaion aganst PM Narendra Modi at Nashik
Congress agitaion aganst PM Narendra Modi at NashikSarkarnama

नाशिक : ‘महाराष्ट्राचा (Maharashtra) अवमान करणाऱ्या केंद्र सरकारचा (Centre Government) निषेध असो’, ‘देशाची दिशाभूल करणारे मोदी (Narendra Modi) सरकार हाय हाय’ आदी घोषणांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय परिसर दणाणून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेस विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले. याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

Congress agitaion aganst PM Narendra Modi at Nashik
महिलांचा अपमान करायचा आणि माफी मागायची, हे समर्थनीय नाही!

यावेळी शहराध्यक्ष आहेर म्हणाले, गतवर्षीच्या कोरोना उद्रेकाच्या काळात मजुरांच्या स्थलांतरासाठी केंद्र सरकारने कोणतीही दळणवळण यंत्रणा कार्यान्वित केलेली नव्हती, याकडे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी लक्ष वेधले. व्यवस्थाच नसल्याने हजारो मजुरांना पायीच घरी जाण्याची वेळ केंद्रातील मोदी सरकारमुळे आली होती. यादरम्यान पायी प्रवास करणाऱ्या अनेकांना जीवही गमवावा लागला होता, असे सांगून श्री. आहेर यांनी या चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप केंद्र व मोदी सरकारवर केला. काँग्रेस पक्षाच्या तीव्र भावना राष्ट्रपतींपर्यंत पोचाव्यात, तसेच पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही श्री. आहेर यांनी या वेळी केली.

Congress agitaion aganst PM Narendra Modi at Nashik
काँग्रेस नेते म्हणतात, शर्म करो, मोदीजी शर्म करो!

केंद्र शासनाने वाऱ्यावर सोडलेल्या गरीब, मजूर व गावाकडे परतणाऱ्या नागरिकांना सुविधा, भोजन व मदत करण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले होते. तेव्हा सरकार चालवणारे भाजप व केंद्र सरकार निद्रीस्त होते. त्यावर सगळ्यांची टिका केली होती. हे केंद्र सरकार विसरले असेल, जनता विसरणार नाही, असेही आंदोलकांनी सांगितले.

महाराष्ट्र काँग्रेसने राज्यासह देशभरात कोरोना पसरविणाच्या गंभीर आरोपाबाबत प्रदेश काँग्रेसने राज्यभर निषेध करण्याची घोषणा मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानुसार काँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन छेडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल तीव्र निषेध करण्यात आला.

या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, मध्य ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, नगरसेवक शाहू खैरे, महिला शाखेच्या शहराध्यक्ष नगरसेविका वत्सला खैरे, हनिफ बशीर, विजय राऊत, राजेंदर बागूल, लक्ष्मण जायभावे, नगरसेवक राहुल दिवे, समीर कांबळे, आशा तडवी, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, सिडको ब्लॉकचे विजय पाटील, अण्णा मोरे, लक्ष्मण धोत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी केंद्र सरकारविरोधी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com