Dr Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Keralam Assembly Election: केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपचा `महाराष्ट्र कार्ड`; डॉ. भारती पवार मैदानात

BJP will show its influence in Kerala Assembly elections, strategy decided-केरळम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यंदा भाजपची मोदी स्ट्रॅटेजी प्रभाव दाखवणार?

Sampat Devgire

Dr Bharti Pawar News: केरळम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप यंदा पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. त्या दृष्टीने प्रभारी विनोद तावडे यांनी आपली स्ट्रॅटेजी ठरवली आहे. महाराष्ट्रातील विविध प्रमुख नेते त्यासाठी केरळमध्ये तळ ठोकणार आहेत. 

भारतीय जनता पक्षाकडून आगामी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी खास नियोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर अनेक नेते या निवडणुकीत प्रचार करणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच अतिशय बारीक नियोजन केले जात आहे. नाशिकच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या देखील प्रचारात उतरल्या आहे.

महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्याकडे केरळ निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने विविध प्रमुख नेत्यांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित नेते निवडणूक प्रचाराची पूर्ण सूत्रे आपल्याकडे ठेवतील. 

केंद्रीय माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे कोची येथील अल्लपूझा लोकसभा मतदारसंघाचे जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ पवार यांनी नुकताच पहिला दौरा केला. यावेळी मतदार संघातील सर्व सात विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधींची चर्चा करण्यात आली. 

केरळ राज्यात भारतीय जनता पक्षाला प्रभावी कामगिरी यापूर्वीच्या निवडणुकीत करता आलेली नाही. मात्र गेले काही दिवस पक्षाने सातत्याने येथे जम बसविण्यासाठी प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला मिळणाऱ्या मतांची संख्या वाढत आहे. हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन पक्षाने यंदा विशेष नियोजन केले आहे.  

अनेक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध राजकीय उपक्रम होत आहेत. विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुकीचे नियोजन केले जात आहे. महाराष्ट्रसह अन्य राज्यातील नेत्यांनाही निवडणुकीच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. 

विकास आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामगिरीवर या निवडणुकीत आम्ही भर देत आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. आगामी निवडणुकीत निश्चितच अधिक प्रभावी कामगिरी करण्यात भाजप यशस्वी होईल असा दावा, डॉ भारती पवार यांनी केला.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT