Girish Mahajan: गिरीश महाजन यांचा नगरसेवकांना सल्ला; नगरसेवक झालात, आता आमदार व्हा!

Girish Mahajan advice to corporators become MLA: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांच्या कामाचे केले तोंड भरून कौतुक!
Girish-Girish Mahajan on Maharashtra Assembly elections
Girish Mahajan on Maharashtra Assembly electionsSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan speech highlights: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार झाला. गिरीश महाजन यांनी यावेळी नगरसेवकांना राजकीय सल्ला दिला. त्यांचा हा सल्ला चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

नाशिक महापालिकेच्या नुकत्यात झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर ७२ नगरसेवक निवडून आणले. महायुतीचे शंभरावून अधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यांचं सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मंगळवारी झाला.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे कौतुक केले. म्हणाले शहरातील १३ लाख मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे तुमच्यावर शहराच्या समस्यांची आणि विकासाची जबाबदारी आहे.

Girish-Girish Mahajan on Maharashtra Assembly elections
Modi foreign policy controversy : 'पंतप्रधानांना बाहेर थांबावं लागायचं…'; मंत्री विखेंनी सोनिया गांधींना सुनावली जुनी आठवण

सध्याचे राजकारण पाहता आमदार आणि खासदार होणे सोपे असते. मात्र नगरसेवक होणे अतिशय कठीण असते. निवडणूक जेवढी स्थानिक पातळीवर जाईल तेवढी ती अवघड होत जाते.

Girish-Girish Mahajan on Maharashtra Assembly elections
Balasaheb Thackeray Arrest: शिवसेनाप्रमुखांच्या अटकेच्या चर्चेला पूर्णविराम? `आमचा काही संबंध नाही!` रघुवंशींच्या दाव्यावर भुजबळांनी झटकले हात

शहरातील नगरसेवकांना आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्यांनी विविध टिप्स दिल्या. यंदा निवडून आलेले नगरसेवक खऱ्या अर्थाने पुण्यबान आहेत. यांना सिंहस्थ कुंभमेळ्यात काम करण्याची संधी लाभली आहे. हा कुंभमेळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे.

शहराच्या नागरिकांच्या विविध अपेक्षा नगरसेवकांकडून असतात. त्यादृष्टीने चांगले काम करून नगरसेवकांना यशस्वी होता येईल. चांगले काम करा आणि आमदार व्हा, असा सल्ला मंत्री महाजन यांनी दिला.

यावेळी महापौर हिमगौरी अडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील शाळांची स्थिती आणि दर्जा सुधारावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com