Chandrashekhar Bavankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News : `भाजपला पुन्हा एक मिस कॉल करा`

Sampat Devgire

Chandrashekhar Bavankule News : भारतीय जनता पक्षाच्या योजनास कामकाज, विकासाचे व्हीजन घेऊन पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील साठ हजार घरांत जावे. त्या घरातील व्यक्तीच्या मोबाईलवरून भाजपला मिस कॉल करावा, म्हणजे ते कुटूंब भाजपशी कनेक्ट होईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Chandrashekhar Bavankule took a meeting of BJP office bearers in Nashik)

देशात व राज्यात (Maharashtra) पुन्हा एकदा भाजपचीच (BJP) सत्ता येणार आहे. त्यासाठी जे जे बरोबर येतील त्या राजकीय पक्षांना बरोबर घेतले जाईल. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक कुटूंबाशी संपर्क करावा, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आवाहन केले.

भाजपने यापुर्वी केंद्रात सत्तेत येण्यासाठी नवे तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर केला होता. त्यातून मिस कॉल करून पक्षाचा सदस्य होण्याची मोहीम केली होती. त्यात जगातील सर्वाधिक सदस्य असलेला राजकीय पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता पुन्हा त्याच तंत्राचा वापर करून प्रचारासाठी लोकांना कनेक्ट करण्याचे धोरण हाती घेतले आहे. त्यातून थेट प्रत्येक घरात सोशल मीडियाद्वारे पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले.

श्री. बावनकुळे भाजपच्या संघटनात्मक विस्तार तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून राज्यभर दौरा करीत आहेत. त्यांनी नाशिकला पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी टीप्स दिल्या.

यावेळी बावनकुळे म्हणाले, सध्या पक्षाने राज्यातील सर्व शहर आणि जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पुढच्या टप्प्यात कार्यकारीणी जाहीर करण्यात येईल. त्यात सर्व घटकांना स्थान देऊन पक्षाला ज्यांचा ज्यांचा उपयोग होईल त्या सर्वांना सहभागी करावे. तसे करताना सोशल इंजिनीअरींगचा प्रयोग केल्यास पक्षाला नक्कीच यश येईल.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुप मोठे काम केले आहे. विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यामुळे त्यांचा भर अपप्रचारावर आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील साठ हजार घऱांमध्ये जाऊन संपर्क करावा. पक्षाचे कामकाज आणि धोरण लोकांना सांगावे. त्यांच्या फोनवरून पक्षाच्या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. त्यातून तो मतदार भाजपशी जोडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT