Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न!

Sampat Devgire

लासलगाव : शासनाने (Maharashtra Government) बाजार समित्यांमध्ये सोसायटी (APMC) संचालकांऐवजी सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणे योग्य आहे. मात्र या बाजार समित्यांना खर्चामुळे निवडणुका घेणे कठीण होणार असून, खर्चामुळे संस्था मोडकळीस निघतील. नव्या दुरुस्तीने भाजपकडून (BJP) सरकार चळवळ मोडकळीस काढली जात असल्याची टीका माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. (Chhagan Bhujbal criticise Government decision)

लासलगाव येथे नवनिर्वाचित विविध सहकारी सोसायटी संचालकांचा जाहीर सत्कार व शेतकरी मेळावा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, या संस्थाकडे पुरेसा निधी नाही. सहकार संस्थांवर यांचे सदस्य नसल्याने गेल्या सरकारमध्येही त्यांनी बाजार समित्यांवर आपले प्रतिनिधी मागच्या दाराने आत पाठविले होते. त्यांना आपले लोकप्रिनिधी वाढवायचे असेल, तर त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे.

छगन भुजबळ म्हणाले, की सहकार म्हणजे स्वहाकार नव्हे, सहकारी संस्था टिकविण्यासाठी चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची गरज आहे. संचालक मंडळांनी या संस्था ओरबडल्या आहेत. त्यामुळे काही सहकारी संस्था अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बँकेतही हीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचे काम सहकारी सोसायट्यांनी केले. सोसायट्या केवळ कर्जपुरवठा करण्यापुरत्या मर्यादित नसाव्यात त्यांनी आपल्या कार्यकक्षाही वृद्धिंगत कराव्यात. राज्यातील अनेक सहकारी संस्थांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहे. त्यांचा आदर्श सर्व सोसायट्यांनी घ्यावा. आमचा सहकार आम्ही मोडीत निघू देणार नाही, वेळप्रसंगी तुमचं सरकार मोडीत काढू. महाविकास आघाडी यापुढेही निवडणुकींना एकत्रित सामोरे जाईल. यासाठी सर्वांनी संघटन मजबूत करावे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्यांनी सात ते आठ दिवसांपासून सूर्यच दिसत नव्हता, तो शिंदे गटात गेला की काय, अशी मिश्किल टीपणी त्यांनी केली. नाशिक- मुंबई प्रवास खड्डयांमुळे अवघड झाल्याचे तसेच मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या पुढे प्रवास करावा, अशी टीका त्यांनी केली.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, गुणवंत होळकर, हरिश्चंद्र भवर, निफाडचे माजी उपनराध्यक्ष अनिल कुंदे, प्रकाश वाघ, शिवाजी सुरासे, शिवाजी सुपनर, शिवाजीराव ढेपले, दत्तू पाटील डुकरे, ललित दरेकर, संजय होळकर, सचिन दरेकर, अशोक गवळी, मंगेश गवळी, बबन शिंदे, अशोक नागरे, डॉ. श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, डॉ. विकास चांदर, ज्ञानेश्वर शेवाळे, विलास गोऱ्हे, विशाल पालवे, विनोद जोशी आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT