Aditya Thackrey & Seema Hiray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : भाजपच्या दांडगाईने पर्यावरणवाद्यांना आठवला आदित्य ठाकरेंचा तो दौरा...

BJP Workers aggressive to cut more then fourty Trees for road construction, Strong opposition of Tree lovers-रस्त्यासाठी भारदस्त वृक्ष तोडण्यावरून भाजप आणि पर्यावरणवादी यांच्यात वाद, पर्यावरणवाद्यांना आठवला आदित्य ठाकरेंचा तो दौरा...

Sampat Devgire

BJP Vs Tree Lovers News : भाजप आमदाराच्या पुढाकारेन सिडको भागात रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी चाळीसहून अधिक जुने झाडे तोडली जाणार आहेत. मात्र काम सुरू केल्यावर याबाबत नागरिकांच्या हरकती मागविल्याने नवा वाद उफाळून आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात आयटीआय पूल ते वावरे नग हा वीस कोटींचा सिमेंटचा रस्ता होत आहे. हा रस्ता आता पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमी विरूद्ध भाजप कार्यकर्ते यांच्यातील लढ्याचे कारण बनले आहे. विशेष म्हणजे यात शिवसेना शिंदे गटानेही उडी घेतल्याने तो चर्चेचा विषय आहे.

विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करावी की पर्यावरण संरक्षणासाठी ती थांबवावी, यावरून दोन गट आमनेसामने आले. नाशिक महापालिकेत त्याबाबत बैठक झाली, मात्र तोडगा निघाला नाही. एका बाजूला वृक्षप्रेमी झाडे वाचवण्यासाठी ठाम उभे राहिले, तर दुसऱ्या बाजूला विकास समर्थकांनी झाडे तोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

या दोन्ही गटांमध्ये तीव्र वाद झाल्याने परिसर तणावपूर्ण बनला आणि पोलिसांना तातडीने बंदोबस्त वाढवावा लागला. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीची योजना आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींनी याला जोरदार विरोध दर्शवला. त्यांनी महापालिकेकडे हरकत नोंदवत झाडांची कत्तल थांबवण्याची मागणी केली होती. त्यामुळे मंगळवारी सातपूर विभागीय कार्यालयात सुनावणी आयोजित करण्यात आली होती.

वृक्षतोड समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाढत्या तणावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला. मोठ्या प्रमाणावर लोक या वादात सहभागी झाल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला आणि काही वेळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वृक्षप्रेमींना आश्वासन दिले की, हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

यानिमित्ताने सिडको भागाातच उड्डानपूल मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी वडाची जुनी झाडे तोडली जाणार होती. त्याला नागरिक व पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते विरोधासाठी पुढे आले नव्हते. उलट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खास दौरा काढून या भागाला भेट दिली.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संवेदनशीलपणे वृक्षतोडीला विरोध केला. पर्यावरणवाद्यांचे म्हणने ऐकून घेतले. कार्यकर्ते नेत्यांना पर्यावरण आणि झाडांचे महत्त्व समजावून सांगितेल. येथे मात्र कंत्राटदारांच्या बाजून भाजप व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कार्यकर्ते उतरल्याने त्याला वेगळाच राजकीय वास येत असल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, वृक्षतोडीला कडाडून विरोध करणाऱ्या नागरिकांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. हा वाद आता सामाजिक आणि राजकीय स्वरूप धारण करू लागला आहे. वृक्षतोड होऊ नये यासंदर्भात २२ हरकती आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. यासंदर्भात कंत्राटदाराला फक्त रस्ता करण्यात रस आहे. त्यासाठी त्याने या झाडांच्या मुळ्या देखील उकरल्या. त्यामुळे त्याला कोणाचे राजकीय पाठबळ आहे, हा चर्चेचा विषय आहे.

---

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT