Malegaon MIM News: मालेगाव महापालिकेत कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या मुकादमाला ‘एमआयएम’ नगरसेवकाने मारहाण केली. माझ्या प्रभागात माझ्या इच्छेविरुद्ध तुझी बदली कशी झाली. याचा जाब विचारण्यावरून हा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडिओ शहरात देखील व्हायरल झाला आहे.
मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये बीट मुकादम अजय चांगरे याची बदली झाली होता. त्याने आपल्या कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘एमआयएम’चे नगरसेवक अब्दुल माजिद युनूस इसा याने त्याला जाब विचारला. त्यावेळी झालेल्या वादात माजी नगरसेवकाने या कर्मचाऱ्याला मारहाण केली.
शहरात ‘एमआयएम’ आणि अन्य विरोधी पक्षात सध्या महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर या मारामारी कडे पाहिले जाते. अब्दुल माजीद हे माजी महापौर युनूस ईसा यांचे चिरंजीव आहेत.
शहरात ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुक्ती आहेत. त्यामुळे सत्ताधारी म्हणून एमआयएमच्या कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सातत्याने व्यवस्थेवर आपले नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातूनच हा प्रकार झाल्याचे बोलले जाते.
माजी नगरसेवक अब्दुल माजिद यांनी बीट मुकादम चांगरे यास माझ्या परवानगीशिवाय येथे तुझी नियुक्ती कशी झाली? तुला कसे काम करता येते तेच पाहतो, असे सांगत दमबाजी केली. त्यानंतर त्यांनी मारहाण केल्यावर मुकादमानेही प्रत्युत्तर म्हणून माजी नगरसेवकांना त्याच भाषेत उत्तर दिले. यावेळी मोठी गर्दी देखील जमा झाली होती. त्यातील काहींनी याबाबतचे चित्रीकरण केले. नंतर हा व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला.
यावेळी सचिन त्रिमुखे चेतन चौधरी, भागेश गंगवाल आदींनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मारामारी वाढतच गेली. यासंदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. विविध राजकीय संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे
या संदर्भात शहरातील महापालिका कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. याबाबत कायदा हातात घेणाऱ्या राजकीय नेते आणि माजी नगरसेवकांना प्रशासनाने जाब विचारावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. मालेगाव शहरात असे प्रकार वरचेवर घडत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये तो नेहमीच चर्चेचा विषय असतो.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.