BJP Workers agitaion at Bhujbal Farm Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सरस्वतीची प्रतिमा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते भुजबळ फार्मवर!

पोलिसांचा हस्तक्षेप, सरस्वती प्रतिमा भेट देण्याचा प्रयत्न अयशस्वी.

Sampat Devgire

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती (Goddess Sarswati) प्रतिमा संदर्भात विधान केले होते. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP Workers) कार्यकर्त्यांनी बुधवारी थेट भुजबळ फार्म येथे जाऊन सरस्वतीची प्रतिमा भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रोखल्याने त्यांचा तो प्रयत्न निष्फळ झाला. (BJP workers try to gift Goddess sarswati frame to Chhagan Bhujbal)

श्री भुजबळ यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात शाळांमध्ये लावल्या जाणाऱ्या सरस्वती प्रतिमा संदर्भात वक्तव्य केले होते. शाळांमध्ये सरस्वती व शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्या देवीला आम्ही कधी पाहिलं नाही जिने कधी आम्हाला शिकवलं नाही जर शिकवलेच असेल तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवले व आम्हाला दूर ठेवलं त्यांची पूजा कशासाठी करायची, त्या ऐवजी ज्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला त्या फुले-शाहू-आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो शाळांमध्ये लावावे. असे वक्तव्य केले होते.

त्या वक्तव्यावर आज प्रतिक्रिया उमटतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात कोणाला काही वाटत असले तरी सरस्वतीची प्रतिमा काढली जाणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्मवर धडक दिली.

त्यापूर्वीच निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सरस्वती प्रतिमा व सावित्रीबाई फुले यांनी सरस्वती वर लिहिलेला काव्यसंग्रह भेट देण्याचा प्रयत्न केला निवासस्थानी श्री भुजबळ उपस्थित नव्हते. भुजबळ फार्म बाहेरच कार्यकर्त्यांनी सरस्वतीचे पूजन करत आरती म्हटली.

यावेळी विरोधात घोषणा देण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवाळला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे, चंद्रशेखर पंचाक्षरी, विजय बनसोडे, राहुल कुलकर्णी, ऋषिकेश आहेर, धनंजय पुजारी, वैभव महाले, संदीप शिरोळे, साक्षी दिंडोरकर, प्रवीण भाटे, प्रशांत वाघ, विनोद येवले, भाविक तोरवणे, विकी पाटील, मुफदल पेंटर आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT