आमदारांना दिवाळी गिफ्ट; ठाकरे सरकारच्या कामांवरील स्थगिती उठवली!

राज्यातील सत्तांतरानंतर विकासकामांना दिलेली स्थगिती राज्य शासनाने उठवली
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

नाशिक : शिवसेनेत (Shivsena) बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार आले. हे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीने (DPDC) मंजुर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे आमदारांत नाराजी तर कंत्राटदार टेन्शनमध्ये होते. या सगळ्यांचे टेन्शन शिंदे सरकारने कमी केले असुन कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. (State Government roll back adjournment on devolopment works in the state)

Eknath Shinde
छगन भुजबळांच्या मतदारसंघातले पाणी अडवणारे कोण?

राज्य शासनाने मंगळवारी सायंकाळी उशीरा याबाबत एक आदेश काढला आहे. सर्व जिल्हाधिकारी तसेच नियोजन मंडळाच्या सचिवांना हे पत्र देण्यात आले आहे. त्यात यापूर्वी विकासकामांना दिलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.

Eknath Shinde
Shivsena: शिवसेनेच्या शक्तीप्रदर्शन, डावपेचांनी शिंदे गटाची सत्ता निष्प्रभ!

राज्यातील आमदारांच्या मतदारसंघातील हजारो कोटींच्या कामांचे निर्बंध कमी झाल्याने त्यात कंत्राटदारांची अप्रत्यक्षरित्या दिवाळीच झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार तसेच कंत्राटदारांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे.

राज्यात भारतीय जनता पक्षाच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तित्वात आल्यावर राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे सरकार यांच्यात राजकीय वाद-विवाद सुरु झाला होत. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदे यांनी बंड केले होते. त्या कालावधीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांत तातडीच्या तसेच काहींनी ऑनलाईन बैठका घेऊन जिल्हा नियोजन मंडळाच्या अनेक योजनांना मंजुरी दिली होती. त्यात अनेक मोठ्या प्रकल्पांचा समावेष होता. या कामांना मंजुरी देण्याचा धडाकाच राज्यभर सुरु होता.

त्यानंतर एकनाथ सिंदे सरकार सत्तेत आल्यावर ज्या ज्या जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांशी जमत नव्हते अशा आमदार तसेच त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाकडून त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत विविध जिल्ह्यांतील मंजुर कामांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. अशी हजारो कोटींची कामे होती. त्यात नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुमारे सहाशे कोटींची कामे होती. त्यांना आमदार सुहास कांदे यांच्या तक्रारीमुळे स्थगिती दिली होती. त्यावरून मोठा वाद देखील झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com