Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सरकारची निष्क्रियता जनतेसमोर प्रखरतेने मांडा

Sampat Devgire

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत नगरपंचायतींना निधी न दिल्याने विकास खुंटला असून, सरकारची निष्क्रियता जनतेसमोर प्रखरतेने मांडा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले.

उत्तर महाराष्ट्रातील ११३ नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून शनिवारी शहरातील आडगाव नाका येथील स्वामिनारायण बॅंक्वेट हॉलमध्ये नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

या वेळी जिल्हानिहाय नगरपंचायतीमधील संख्याबळ, सध्याची राजकीय परिस्थिती, प्रभागरचना, इच्छुकांची संख्या आदींचा आढावा घेण्यात आला. नाशिकमधून जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी आढावा घेतला. माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमाल रावल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हीना गावित, रक्षा खडसे, सुजय विखे-पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. विजयकुमार गावित, प्रा. राम शिंदे, आमदार डॉ. राहुल आहेर, अमरिश पटेल, प्रा. देवयांनी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, जिल्हा सरचिटणीस डॉ. सुनील बच्छाव, एन. डी. गावित, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT