Vivek Kolhe MLA Kishore Darade sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vivek Kolhe On MLA Kishore Darade : विवेक कोल्हेंचा आयुक्तालयात रुद्रावतार; दमदाटी करणाऱ्या आमदाराला पोलिसांसमोरच दरडावले...

Pradeep Pendhare

Nashik Teachers Constituency : नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक आयुक्तालयात चांगलीच धुमचक्री झाली. आमदार किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या किशोर दराडे यांना मारहाण केली. आपल्याच समोर आपल्याच प्रतिस्पर्धीला मारहाण होत होती. तरी देखील भाजपचे युवा नेते उमेदवार विवेक कोल्हे हे त्यांच्या मदतीला धावले. आमदार किशोर दराडे यांच्यासह तिथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना देखील या प्रकारावर खडसावलं. विवेक कोल्हे यांच्या या डेअरिंगबाजपणाची आता चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी नाशिक आयुक्तलयात आमदार किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत केली. आमदार दराडे यांच्या नावाशी नावात साधर्म्य असलेले आणखी एका किशोर दराडे यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरला.

नावात साधर्म्य असलेल्या दराडेंनी अर्ज भरू नये म्हणून, त्यांच्यावर तिथेच आयुक्तालय परिसरात दबाव आणला जात होता. तरी पण त्या दराडे यांनी अर्ज भरला. यामुळे आमदार दराडे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि साधर्म्य असलेल्या दराडे नावाच्या व्यक्तीला धक्काबुक्की करत मारहाण केली. यामुळे आयुक्तालयात पळापळी झाली. त्यातून तणाव निर्माण झाला.

आयुक्तालयात एका व्यक्तीला मारहाण होते हे पाहून तिथे निवडणुकीच्या कामानिमित्ताने पोहोचलेले भाजपचे (BJP) युवा नेते अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे पुढे धावून जात नावात साधर्म्य असलेल्या किशोर दराडे यांना सावरले. त्यावेळी तिथे पोलिस देखील होते. विवेक कोल्हे यांनी तिथे असलेले आमदार किशोर दराडे यांच्यासह सर्वांना चांगलेच सुनावले.

"पोलिस आयुक्तालयात ही मारामारी होत आहेत. एकाचे शर्ट फाडला जात आहे. बटणे तोडली जात आहे. धक्काबुक्की होत आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी करण्याचा अधिकार दिलाय. कोणीही अर्ज भरला तरी, अशी दमदाटी कशी चालणार? आमदारच, अशी दमदाटी करायला लागले, तर कसे होणार? अशा शब्दात आमदार दराडे यांना सुनावले". पोलिसांसमोर अशी मारहाण होत आहे. कसे होणार? असा विवेक कोल्हे यांनी पोलिसांना सवाल केल्यावर पोलिसांनी पुढे येते संबंधितांनी तक्रार देताच, आम्ही कारवाई करणार, असा इशारा दिला. यानंतर नावातील साधर्म्य असलेले किशोर दराडे यांना पोलिसांनी संरक्षणात घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विवेक कोल्हे यांनी विद्यमान आमदार किशोर दराडे आणि पोलिसांना या प्रकारावरून पोलिसांना सुनावल्याची चर्चा आहे. या प्रकारावर विवेक कोल्हे यांनी टिप्पणी केली आहे. "शिक्षकांच्या मतदारसंघात निवडणूक होत आहे. शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. त्याला असे गालबोट लागत असेल, तर गंभीर आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही", असा देखील इशारा विवेक कोल्हे यांनी यावेळी दिला.

दरम्यान, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल शेवटच्या 31 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र सादर केले. यानिवडणुकीसाठी आत्तापर्यंत 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. 12 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, धुळे आणि जळगाव या पाच जिल्ह्यातून एकूण 70 हजार 341 मतदार आहेत. 26 जूनला मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT