Nilesh Lanke : नीलेश लंकेंच्या घातपाताचा होता डाव, मातुश्री शकुंतलांनी दिली 'ही' माहिती

Ahmednahgar Lok Sabha Election 2024 Result : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांच्या विजयानंतर निवडणुकीत काय-काय घडले, यावर चर्चा रंगल्या आहेत. यातच नीलेश लंके यांच्या मातुश्री शकुंतला यांनी हादरवून सोडणारा आरोप केला आहे.
Nilesh Lanke Shakuntala Lanke
Nilesh Lanke Shakuntala Lankesarkarnama

Ahmednahgar Lok Sabha Election : नीलेश लंके यांच्या विजयानंतर निवडणुकीत काय आणि कसे झाले? याचे किस्से पुढे येऊ लागले आहे. निकालानंतर राजकीय वातावरण शांत होईल, असे वाटत असतानाच, नीलेश लंके यांच्या घातपातासाठी लाखो रुपयांच्या पूजाअर्चा झाल्याचा गंभीर आरोप नीलेश लंके यांच्या मातुश्री शकुंतला यांनी करत खळबळ उडवून दिली. नीलेश लंके यांच्या यशाचे सेलिब्रेशन महाविकास आघाडीत सुरू असतानाच शकुंतला यांच्या आरोपामुळं निवडणुकीला वेगळं वळण लागलं आहे.

शकुंतला लंके यांनी ही निवडणूक सोपी नव्हती. आमचा पैलवान (नीलेश) बारीक पैलवान आहे. समोरचा पैलवान खूप जड होता. त्यामुळे निवडणुकीत काय होणार याचं टेन्शन होते. निवडणूक सुरू झाल्यापासून टेन्शन होते. चिंता वाटायची. रात-रात झोप येत नव्हती. पण शरद पवारसाहेबांनी (Sharad Pawar) पहिल्यापासून साथ दिली आणि तो (नीलेश) देखील त्यांना मानतो. नगरमध्ये येत त्यांनी मुलासाठी सभा घेतल्या. पारनेरमध्ये सभा घेतल्या. वयोमानानुसार ते मुलाला साथ देत राहिले. एवढ्या मोठ्या माणसांनी साथ दिल्याचे आभार मानले, असे शकुंतला लंके यांनी सांगितले.

यानंतर शकुंतला यांनी यानंतर गंभीर आरोप केला. नीलेशच्या अपघात व्हावा यासाठी काही लोकांनी लाख रुपयांच्या पूजाअर्चा मांडल्या. याचा अपघात व्हावा. गाडीखाली जावा. यामुळं रात-रातभर झोप येत नव्हती. पण मुलाने माझी समजूत काढली. पूजा मांडल्याने कोणी मरत नसते. यावर काही अनोळखींनी माझ्याकडे येऊन फोटो काढले. फोटोवरून काहीतरी होणार म्हणून घाबरले. ते व्हायरल करतील, अशी भीती काहींनी घातली. पण त्याने देखील काय होत नसते, असे सांगितल्यावर शांत झाले. एवढी मोठी ही निवडून ग्रामपंचायतीसारखी लढवली गेल्याचे शकुंतला यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke Shakuntala Lanke
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विखेंसोबत छत्तीसचा आकडा; बाळासाहेबांनी सेलिब्रेशनात जिलेबी वाटली

राज्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी झाली. भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे आणि नीलेश लंके यांच्यात थेट लढत झाली. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती यांच्यात सामना रंगला होता. मतदानाच्या दिवशी मतदारसंघात दिवसभर तणावाचे वातावरण होते.

मतमोजणीच्या दिवशी देखील केंद्रावर रात्री अकरा वाजेपर्यंत तणाव होता. निकालानंतर देखील मतदारसंघात काहीशी राजकीय अस्वस्थता आहे. यातच शकुंतला लंके यांनी मुलगा नीलेश लंकेंविरोधात विरोधकांनी काय काय प्रयोग केले, यावर प्रकाशझोत टाकला. यात खळबळ उडवून देणारा आरोप केल्याने ही निवडणूक कोणत्या थराला पोहोचली होती, याची गंभीरता लक्षात येते.

Nilesh Lanke Shakuntala Lanke
Shirdi Lok Sabha Election 2024 Result : शिर्डीत ठाकरेंची मशाल धगधगणार; लोखंडेकडून धनुष्यबाण काढून घेणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com