BJP On Jitendra Awhad sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांना माफी नाही; भाजप युवा मोर्चाचा इशारा...

Pradeep Pendhare

Nagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नगरमध्ये भाजप आक्रमक झाली आहे. भाजप (BJP) युवा मोर्चातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारत आंदोलन करण्यात आले. नगर शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात भाजप (BJP) युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मयुर बोचुघोळ, सागर शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे दोन श्‍लोक घेतल्याचा निषेधार्थ शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड महाडला मनुस्मृती दहन करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीवरून त्यांच्याविरुद्ध राज्यभरात तीव्र भावना व्यक्त होत आहे. नगर शहरात देखील आव्हाड यांच्या या कृतीचे पडसाद उमटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या या कृतीविरोधात जोरदार निदर्शने केली. यानंतर त्यांच्या प्रतिमेस जोडे मारले. भाजप पदाधिकारी या निषेधात सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाड वारंवार महापुरुषांचा अवमान करणारे नेते आहेत. या नेत्याला भविष्यात नगर शहरात येऊ देणार नाही. नगरमध्ये हा नेता आल्यास काळे फासू, असा इशारा भाजप युवा मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.

मयुर बोचुघोळ यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीवर जोरदार टीक केली. "आव्हाड राजकारणातील नौटंकीकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी कशापद्धतीने फाडले, हे जगाने बघितले. यातून त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे". त्यांच्या कृतीतून बाबासाहेबांबद्दल त्यांची किती श्रद्धा आणि निष्ठा दिसून येते. त्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून, आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी मयूर बोचुघोळ यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT