Dinkar Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dinkar Patil : नाशिक लोकसभेसाठी भाजपच्या दिनकर पाटलांनी ठोकले शड्डू ; राजकीय चर्चांना उधाण!

Nashik Loksabha Constituency : शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चेवरही स्पष्ट केली आहे भूमिका, म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

अरविंद जाधव-

Loksabha Election : नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे दिनकर पाटील इच्छूक आहे. तसेच जागा वाटप झालेली नसताना आणि शिवसेना(शिंदे गट), भाजपा एकत्र असताना पाटील यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर विकास कामांच्या मुद्यावरू टीका केली आहे.

पक्षाने मला काम करण्याचे आदेश दिल्याचे पाटील उघडपण सांगत असले तरी, त्यांच्या प्रचार पत्रकात कोठेही पक्ष व नेत्यांचा उल्लेख नसल्याचे दिसून येते. तर काहीही झाले तरी निवडणूक लढवायचीच असा चंग दिनकर पाटील यांनी बांधल्याने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे मात्र, अद्यापपर्यंत जागा वाटपच झालेले नाही. तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघ(Nashik Loksabha Constituency) भाजपाकडे कधीच नव्हता. पांरपारीक पद्धतीने येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीतच सरळ लढत होते. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली तर काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या पार्श्वभूमीवर दिनकर पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. मात्र, अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे ‘सरकारनामा’ प्रतिनिधीशी बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मी पक्षासोबत आणि पक्ष माझ्यासोबत आहे. पवारांशी गाठभेट झालीच नाही, असे दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मी पक्षासोबत असल्याचा दावा करणाऱ्या दिनकर पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष तसेच डिजीटल माध्यमातून प्रचार प्रसार सुरू आहे. मात्र, यात कोठेही भाजपा(BJP) अथवा पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख नाही. जर पक्षाने तिकीट नाकारले किंवा पक्षाला जागाच मिळाली नाही तर काय, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या सध्याच्या प्रचारात तर दडलेले नाही ना, अशी चर्चा यानिमित्ताने होते आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात वर्षानुवर्षे शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हा मतदारसंघ कोण लढवणार, यासाठी महायुतीतच रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्याचे खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) शिंदे गटाच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून या जागेवर हक्क सांगितला जातो आहे.

तर, शिंदे .गटाला दुसरी जागा देऊन नाशिकचा हक्क आपल्याकडे घेण्याची रणणिती भाजपाकडून आखली जाते आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सुद्धा येथे सक्रीय असल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT