Loksabha Election : भाजपच्या जळगाव लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाने 'हे' कारण सांगत केला दावा!

Jalgaon Lok Sabha constituency : जिल्हा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत?
Sunil Choudhary
Sunil Choudhary Sarkarnama

Jalgaon Shivsena News : मागील पाच टर्म पासून भारतीय जनता पक्षाचा खासदार असलेल्या जळगाव लोकसभा मतदार संघावर आता शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केला आहे.

जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून ते रविवारी जळगाव जिल्हयात आले होते. यावेळी त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao patil), आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Choudhary
Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी फेटाळली 'घरवापसी'ची शक्यता

यानंतर पत्रकारांशी बोलताना सुनील चौधरी म्हणाले,की 'जळगाव लोकसभा मतदारसंघात रविवारी भाजपचे(BJP) खासदार असेल तरी आमच्या शिवसेनेची ताकद या मतदारसंघात मोठी आहे, तीन आमदार आमचे या मतदार संघात आहेत.तसेच कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपात आम्ही जळगाव लोकसभा मतदार संघाची मागणी करणार आहोत.'

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचेही या मतदार संघाकडे लक्ष आहे, त्यांनीही हा मतदार संघ आपल्याकडे घेण्याची तयारी दर्शविली आहे.

याशिवाय, 'जळगाव लोकसभा मतदार संघात आमच्या पक्षाकडे भक्कम उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्यामुळे आमची या लोकसभा मतदार संघासाठी आम्ही कसोशीने तयारी करीत आहोत असेही चौधरी म्हणाले आहेत.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघावर गेली सहा टर्म भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व आहे. पक्षाची या दोन्ही मतदार संघावर मजबूत पकड आहे. पक्षातर्फे लोकसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार सहसा बदलले जात नाहीत. त्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाते हे मागील निवडणुकीवरून दिसून येते. अपवाद काही एक दोन राजकीय प्रसंग आणि डावपेच असल्याचा आहे.

Sunil Choudhary
Sangola Politics : एकवेळ मी बाजूला बसेन; पण दीपक साळुंखेंना आमदार करेन : शहाजीबापूंची घोषणा

यावेळी भारतीय जनता पक्षाचे दोन्ही खासदार आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, राजकारणाचा पोत बराच बदलला आहे. भाजपचे जुने मित्र ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षासोबत आहे. त्यामुळे पक्ष या दोन्ही उमेदवारांना पुन्हा संधी देवून भाकरी तीच ठेवणार की नवीन उमेदवारांना संधी देऊन फिरवणार याकडेच आता जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com