Satish Kulkarni, Mayor
Satish Kulkarni, Mayor Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाजपचा महत्त्वाकांक्षी ‘आयटी हब' प्रकल्प

Sampat Devgire

नाशिक : आडगाव शिवारात साकारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या (Nashik NMC) आयटी हबच्या माध्यमातून शहर विकासाला वेगळी दिशा मिळणार आहे. या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी सुशिक्षितांना प्राप्त होणार असल्याचे मत महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी व्यक्त करताना पायाभूत सुविधा, हवामान व दळणवळणाची सुविधा लक्षात घेता देशातील सर्वोत्कृष्ट आयटी हब होण्याची क्षमता नाशिकमध्ये असल्याचे मत व्यक्त केले.

महापालिकेकडून आडगाव शिवारात शंभर एकर क्षेत्रामध्ये आयटी पार्क साकारण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. आयटी पार्कसाठी महापौर कुलकर्णी यांनी पुढाकार घेताना वेगाने सूत्रे हलविली. ठरावाच्या मंजुरीनंतर आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. सरकारने आयटी हब विशेष उद्देश वहन समिती अर्थात स्पेशल पर्पज व्हेईकल साठी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मान्यता दिल्याने आयटी हबचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भात महापौर कुलकर्णी म्हणाले, आयटी पार्कसाठी गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. बाराशे आयटी क्षेत्राशी संबंधित तरुणांची वॉकेथॉन घेण्यात आली. वॉकेथॉनमधून आयटी पार्क व्हावे, अशी जोरदार इच्छा व्यक्त करण्यात आली. त्या वेळीदेखील शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. महापौर पद स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून सोयी- सुविधा उपलब्ध करून देतानाच नाशिकच्या औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रित केले. त्याचे फलित म्हणून केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एसपीव्ही स्थापन करण्यास संमती दिल्याने शहर विकासाला यानिमित्ताने गती मिळणार आहे.

नावलौकिक वाढणार

नाशिक- मुंबई-पुणे या सुवर्ण त्रिकोणातील एक प्रमुख शहर म्हणून नाशिकचा नाव लौकिक आहे. उत्तर महाराष्ट्रातील ३२ टक्के आयटी क्षेत्रातील संबंधित हैदराबाद, बंगलोर, पुणे शहरांमध्ये नोकरीसाठी जातात. आयटी क्षेत्राशी संबंधित ज्ञान घेतलेले मनुष्यबळ व पायाभूत सुविधादेखील नाशिकमध्येच सहजरित्या उपलब्ध होईल, असे असताना सुद्धा आयटी हब या विषयाला चालना मिळाली नाही. परंतु, नाशिकमध्ये आयटी हब बनण्याची मोठी क्षमता आहे. आतापर्यंत राजकीय अनास्थेपायी आयटी हब झाले नाही. भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेने पुढाकार घेत राज्यात आदर्श निर्माण केला.

----

कुंभमेळ्यासाठी देश-परदेशातून नागरिक येतात आयटी हब विकसित होत असल्याने नाशिकची मंत्र भूमिकडून तंत्र भूमिकडे वाटचाल सुकर होईल.

- सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT