मुका बाप कॅन्‍सरग्रस्‍त मुलासाठी अधिकाऱ्यासमोर हात जोडतो तेव्हा...

शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात घडली ही घटना
Eduaction Officer Nitin Upasani
Eduaction Officer Nitin UpasaniSarkarnama

जळगाव : शाळेत शिपाई असताना, दोन वर्षांपासून पगार होत नाही. त्‍यात कॅन्‍सरने ग्रासले. याबाबत वारंवार तक्रार करूनही माध्‍यमिक शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. यामुळे गुरुवारी आपल्‍या कॅन्‍सरग्रस्‍त मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी वडिलांनी शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून विनवणी केली. मुक्या बापाच्या विनवणीने यंत्रणेला पाझर फुटला. शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी (Nitin Upasani) यांनी न्याय देण्याचे आश्‍वासन दिले.

Eduaction Officer Nitin Upasani
भाजपचा आजचा मोर्चा प्रचारला साजेशा होणार की?...

जळगाव शहरातील राजेंद्र वामन जोशी यांची २०१९ मध्ये नूतन मराठा महाविद्यालयाच्‍या हातेड (ता. चोपडा) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात बदली झाली. तेथे जोशी रूजूही झाले. मात्र, २०१९ पासून आजपर्यंत पगारच मुख्याध्यापकाने काढलेला नाही. याबाबत माध्‍यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी केली. मात्र, दोन वर्षांपासून केलेल्या तक्रारींची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली नाही. अशात जोशी यांना कॅन्सरने ग्रासले. पगार नाही, तरीही जोशी यांचा लढा सुरू आहे.

Eduaction Officer Nitin Upasani
अन्य राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका, मग महाराष्ट्राशीच दुजाभाव का?

मुका बाप ओढतोय गाडा

राजेंद्र जोशी यांचा दोन वर्षांपासून पगार बंद. त्‍यात कॅन्‍सरचा इलाज सुरू आहे. कमाविणारे कोणीही नाही. यामुळे म्‍हातारा मुका बाप प्रपंच चालविण्यासाठी सॉ मिलमध्‍ये काम करीत आहे. त्यातून मिळेल त्‍यावर परिवाराचा गाडा हाकत आहेत. हाच मुका बाप मुलासाठी जिल्‍हा परिषदेची पायरी चढतो व शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून विनंती करतो.

अन्‌ त्‍यांनी कैफियत ऐकून दिले आदेश

माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी राजेंद्र जोशी यांचा प्रश्‍न मांडण्यासाठी वार्षिक तपासणीनिमित्त जिल्‍हा परिषदेत आलेले शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्‍यासमोर राजेंद्र जोशी यांच्‍या मुक्‍या बापाला उभे केले. मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेला त्‍या बापाने शिक्षण उपसंचालकांसमोर हात जोडून न्याय मिळण्याची मागणी केली. मुक्या बापाला पाहून शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जळगावातील उपशिक्षक नरेंद्र पाटील यांचाही अर्ज प्रलंबित होता. त्यांनीही भेट घेतली असता, त्यांच्या अर्जावरही कार्यवाही करण्याचे आश्‍वासन शिक्षण उपसंचालकांनी दिले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com