Ahmednagar Bjp sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narendra Modi Oath Ceremony : आनंदोत्सव 'Modi 3.0' सत्ता स्थापनेचा; 'गड आला पण सिंह गेला' याचं कार्यकर्त्यांवर दडपण...

Narendra Modi Oath Taking Ceremony : भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर दोन गट पडलेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सत्तास्थापनेचा आनंदोत्सवाचा उत्साह देखील विखुरला गेला. या उत्साहात विखे गटाचे कार्यकर्ते देखील स्वतंत्र होते.

Pradeep Pendhare

Narendra Modi shapath Vidhi : 'गड आला पण सिंह गेला', असं म्हणत नगर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथेचा आनंदोत्सव साजरा केला. काही कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करताना एकमेंकापासून लांब होते. भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीतील पराभवानंतर दोन गट पडलेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सत्तास्थापनेचा आनंदोत्सवाचा उत्साह देखील विखुरला गेला. या उत्साहात विखे गटाचे कार्यकर्ते देखील स्वतंत्र होते. त्यामुळे भाजपच्या या आनंदोत्सवावर देखील काहीशा संशय, नाराजी आणि दडपण अशी भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये होती.

देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) घेतल्यावर नगर शहर भाजपच्यावतीने सावेडी उपनगरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.'जय श्रीराम', 'भारतीय जनता पक्षाचा विजय असो', 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो', अशी घोषणाबाजी झाली. हा आनंदोत्सवात मोजकेच कार्यकर्ते होते.

भाजपच्या नगर शहरातील मध्यवर्ती कार्यालयात दुसऱ्या गटानं आनंदोत्सव साजरा केला. सकल हिंदू समाजाच्यावतीनं शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर नगर शहर भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे काही जण आनंदोत्सवापासून लांब होते. काही भाजप कार्यकर्त्यांनी आपपाल्या कार्यकर्त्यांबरोबर स्वतंत्र गट स्थापन करून आनंदोत्सव साजरा केला. पण एकत्र येणे टाळले. विशेष म्हणजे, भाजप (BJP) निष्ठावान कार्यकर्त्यांपासून विखे यांचे कार्यकर्ते या आनंदोत्सवापासून स्वतंत्र होते.

नगर शहरातील सावेडी उपनगरात आनंदोत्सव साजरा करताना महेंद्र गंधे यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते होते. महिला आघाडीतील संगीता खरमाळे, गोकुळ काळे, संतोष गांधी, बाबासाहेब सानप, सुमित बटुळे , शरद बारस्कर, वेंकटेश बोमादंडी, ऋग्वेद गंधे, लक्ष्मीकांत तिवारी, दिनेश करमरकर सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी परिसरात पेढे वाटले. 'नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाची वाटचाल विश्वगुरु होण्याच्या दिशेने नक्कीच होईल', असा विश्वास भाजपचे विधानसभा निवडणुक प्रमुख महेंद्र गंधे यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव झाला आहे. या पराभवचे खापर निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते एकमेकांवर फोडत आहेत. यातून कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस वाढली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा आनंदोत्सव भाजप कार्यकर्ते स्वतंत्र गटा-गटाने साजरा करत होते. दरवेळी एकत्र येणारे भाजपचे कार्यकर्ते यावेळी मात्र लांब-लांब होते.

सुजय विखे यांनी दुपारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोटावर मोजता येतील, एवढ्याच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यामुळे भाजपमध्ये गटबाजीचे दर्शन अधिकच गडद झाले. नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या 'Modi 3.0' सत्तेचा आनंदोत्सवात नगरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये संशय, दडपण आणि कुठेतरी नाराजीची भावना होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT