Narendra Modi Oath Ceremony : राष्ट्रपती भवनात मोदींच्या नावाचा जयघोष; मोदी... मोदी...

Narendra Modi Oath Taking Ceremony : भाजपला 240, तर महायुतीला 294 जागा मिळाल्या आहेत. महायुती घटक पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली. त्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

PM Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी लगातार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी शपथ घेण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी राष्ट्रपती भवन परिसरातील गर्दीतून मोदी... मोदी.., असा जयघोष झाला. यावेळी मोदी यांनी अंगावर निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळाले. भाजपला 240, तर महायुतीला 294 जागा मिळाल्या आहेत. महायुती घटक पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाली. त्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर निवडून आलेल्या वरिष्ठ प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली.

या शपथविधीची तयारी राष्ट्रपती भवन येथे करण्यात आली होती. शपथविधीची उत्सुकता सर्वत्र होती. तसे वातावरण निर्माण करण्यात आलं होते. राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नरेंद्र मोदी यांचे कटआऊट उभारण्यात आले होते. फटाके फोडले जात होते. जिलेबी, मोतीचूरच्या लाडूंचे वाटप होत होते. यातून वातावरण निर्माण झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Nitin Gadkari : 'मै नितीन जयराम गडकरी...', सलग तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राष्ट्रपती भवनावर यासाठी कडेकोट बंदोबस्त होता. तसचं राष्ट्रपती भवनावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली होती. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते.

देशातील प्रमुख नेते, उद्योजक, अभिनेता, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना आमंत्रण होते. यासह साधू-संतांना देखील आमंत्रण होते. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेते, पदाधिकारी यांना देखील शपथविधीचे आमंत्रण आलेले आहे. यावेळी राष्ट्रपती भवनाचा परिसर गर्दीनं फुलून गेला होता.

Narendra Modi
Swearing in Ceremony of Narendra Modi : ‘इंडिया आघाडी’तील एकच नेता मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com