BJP Latest News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : दिंडोरी मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली; १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

BJP Political News : '' पक्ष कुणाचीही खासगी मालमत्ता नसल्याने...''

Deepak Kulkarni

संजीव निकम -

Nandgaon : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उत्तर विभागाचे जिल्हाध्य्क्ष शंकरराव वाघ यांच्या राजीनाम्याची मागणी करत पक्षातील जवळपास १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. वाघ यांच्या जागी नवा जिल्हाध्यक्ष नेमावा अशी मागणी करण्यात आली आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव, येवला, निफाड व नांदगाव,मालेगाव तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एल्गार मेळावा नवीन तहसील जवळील श्री सप्तश्रृंगी हाॅलमध्ये पार पडला. दरम्यान,राजीनामा दिलेल्या या पदाधिकाऱ्यांनी पक्षात राहूनच समांतर काम करण्यासाठी रविवारी नरेंद्र - देवेंद्र प्रतिष्टानची स्थापना करत आपली स्वतंत्र मोट रविवारी झालेल्या पक्षाच्या निष्ठावानांच्या मेळाव्यात बांधली.

भाजप(BJP)च्या निष्ठावंत कार्यकर्ते व बूथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. या मेळाव्याच्या व्यासपीठावर एकही पदाधिकारी न बसता त्यांनी व्यासपीठावरील राष्ट्रपुरुषांच्या तसेच पक्ष संस्थापकांच्या प्रतिमांना वंदन करून पक्षध्वजारोहण केले.हा वर्षानुवर्षे भाजपची निष्ठा वाहणाऱ्या कार्यकर्त्यांचा एल्गार मेळावा असल्य्याने कुणीही व्यासपीठावर बसायचे नाही, अशी संकल्पना ठेवण्यात आली. (Latest Marathi News)

मेळाव्यात पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह दिंडोरी(Dindori Loksabha) लोकसभा मतदारसंघातील तालुक्यात करण्यात आलेल्या नियुक्त्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच पक्ष कुणाचीही खासगी मालमत्ता नसल्याने पक्षात राहून सकारात्मक कार्य करण्याचा संकल्प म्हणून नरेंद्र-देवेंद्र प्रतिष्ठानची घोषणा दत्तराज छाजेड यांनी करताच उपस्थितांनी त्यास प्रतिसाद दिला.

जिल्हाभरातील बूथनिहाय कार्यकर्ते आहे. हुजरी करणाऱ्यांना पदे दिली आहे,असा सूर उपस्थितांनी या वेळी लावला. सर्वश्री संतोष पगार,सोमनाथ तळेकर, कैलास शेवाळे, नितीन परदेशी, उद्धव वाघ, राजेंद्र गांगुर्डे, विक्रम निकम, ज्ञानेश्वर पाटील,आदींची भाषणे झाली. या मेळाव्यात सचिन दराडे,जय फुलवाणी,दीपक देसले,मकरंद पाटील बापू काळे, राजू परदेशी,लक्ष्मण निकम,फकीर जगताप,श्रावण गोरे,नितीन परदेशी,एकनाथ बोडखे,नितीन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT