Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' नावे चर्चेत...

Congress : जिल्हाध्यक्ष अमानकर, डॉ.अभय पाटील यांच्यानंतर डॉ.श्रीकांत तिडके यांच्या नावाची चाचपणी
Ashok Amankar, Dr. Abhay Patil, Shrikant tidke
Ashok Amankar, Dr. Abhay Patil, Shrikant tidkeSarkarnama

Akola News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासोबतच राजकीय पक्षांकडून उमेदवारांबाबतही चाचपणी सुरू आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे.

जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर आणि डॉ. अभय पाटील यांची नावे यापूर्वीच चर्चेत आली होती. आता काँग्रेसने मूर्तिजापूरचे प्रख्यात व्याख्याते व ज्येष्ठ समीक्षक डॉ.श्रीकांत तिडके यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. पण जिल्ह्यातील राजकारणात ॲड.प्रकाश आंबेडकर यांचा उदय झाला आणि काँग्रेसच्या हातातील गड गेला. काँग्रेसला तीन दशकापासून येथून खासदार मिळाला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सर्वेक्षणात धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह काँग्रेसनेही कंबर कसली आहे.

Ashok Amankar, Dr. Abhay Patil, Shrikant tidke
Sunil Shelke News : आमदार शेळके टोलनाक्यावर उभे राहिले अन् एका झटक्यात वाहूतक कोंडी सुटली

जिल्ह्यातील सामाजिक समीकरणे बघून काँग्रेस या वेळी मराठा चेहरा देणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यापूर्वी काँग्रेसच्या गोटातून जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर आणि डॉ.अभय पाटील या दोघांची नावे चर्चेत होती. मात्र, आता त्यात शेतकरी व समाजवादी चळवळीतून पुढे आलेले सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ.श्रीकांत तिडके यांच्या नावाबाबतही काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे.

प्रदेश काँग्रेसने मागविला अहवाल

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने योग्य उमेदवाराबाबत काँग्रेसने शोधाशोध सुरू केली आहे. त्यासाठी राजकीय व सामाजिक समीकरणात योग्य असलेल्या उमेदवारांबाबतचा गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसने मागविला आहे. त्यात डॉ.श्रीकांत तिडके यांचाही समावेश आहे. या संदर्भात डॉ.तिडके यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी पक्षाकडून विचारणा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, सर्वांसोबत चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

अकोला जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार ?

अकोला जिल्ह्यातील राजकारण काही विशिष्ट नावांभोवतीच फिरत आले आहे. अशात काँग्रेसने चाकोरी बाहेर जाऊन उमेदवारांची निवड केल्यास जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळू शकते. खासदार संजय धोत्रे यांच्या आजारपणानंतर अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपची बाजू कमकुवत झाली आहे. अशात काँग्रेसने योग्य उमेदवार दिल्यास निकालाचे परिणाम काँग्रेससाठी सरकारात्मक राहण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

Ashok Amankar, Dr. Abhay Patil, Shrikant tidke
Aditya Thackeray On BJP : म्यांव, म्यांवनंतर डरकाळी कशी फुटते आता कळतंय ? ठाकरेंचा भाजपला टोला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com