Vijaykumar Gavit Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar BJP NEWS : अंतर्गत सर्व्हेमुळे विजयकुमार गावित यांना भाजपने दूर केले?

BJP`s internal survey became a hurdle in Dr. Vijaykumar Gavit`s Way-डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गात रस्त्यांची चौकशी प्रमुख अडथळा ठरल्याची चर्चा...

Sampat Devgire

BJP trible politics News : नंदुरबारच्या राजकारणावर आणि सर्व महत्त्वाच्या सत्तेच्या पदांवर आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे वर्चस्व आहे. त्यात पक्ष दुय्यम असल्याची चर्चा श्रेष्ठींना अस्वस्थ करीत होती. यामध्ये रस्ते घोटाळा प्रकरण गावित यांच्या मार्गात अडसर ठरल्याची चर्चा आहे. (Congress and other political opponent became strong in Nandurbar)

नंदुरबारचे (Nandurbar) आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, (ZP) पालकमंत्री अशी सर्व महत्त्वाची सर्व पदे डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्याकडेच आहेत. या सर्व राजकारणात भाजप (BJP) पक्ष म्हणून दुय्यम असल्याची चर्चा आहे.

काल जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील (जळगाव) नंदुरबारचे पालकमंत्री झाले. गावित यांचे पद काढून त्यांना भंडारा जिल्हा देण्यात आला. हा निर्णय आदिवासी राजकारणातील नेत्यांसाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया होती.

उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे आदिवासी म्हणून गणले जातात. त्यात धुळ्याचे पालकमंत्री भाजपचे गिरीश महाजन आहेत. नंदुरबारलादेखील अनिल पाटील हे बिगर आदिवासी मंत्री मिळाले आहेत. या जिल्ह्यांसाठीच्या बहुतांशी शासकीय योजना आदिवासी नागरिकांसाठी असतात. त्यामुळे आदिवासी लोकप्रतिनिधी तसेच या घटकातील नेत्यांत पालकमंत्री बदलल्याचा नकारात्मक संदेश जाऊ शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख सत्तापदे गावित यांच्याच घरात आहेत. त्यामुळे ते सांगतील ती पूर्व दिशा असते. या जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांबाबत संशयास्पदरित्या निधी वळविण्यात आल्याची तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. त्याची चौकशीदेखील सुरू झाल्याचे बोलले जाते. हे प्रकरण गावित यांच्या मार्गात अडथळा ठरला. यातूनच त्यांचे पालकमंत्रिपद गेल्याची चर्चा खासगीत सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT