Sanjay Raut News : फडणवीसांसारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही; राऊतांनी डिवचलं; म्हणाले, मातेरं करून घेतलं...

Maharashtra Politics : मोठ्या भावाला तडजाेडी कराव्या लागत आहेत.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : "महाविकास आघाडीमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिला नाही," असा गंभीर आरोप ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला. "फडणवीसांनी स्वत:चेच मातेरं करून घेतलं, असे राऊतांनी सुनावलं.

राज्यातील पालकमंत्रिपदांमध्ये काल (बुधवारी) काही फेरबदल करण्यात आले. यावर टीका करताना राऊतांनी भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. "भाजप हा मोठा भाऊ आहे, असे फडणवीसांनी सांगितले होते. त्यामुळे मोठ्या भावाला तडजाेडी कराव्या लागत आहेत.

Sanjay Raut News
Anil Patil News : आमदारकीनंतर अनिल पाटलांना आणखी एक लॉटरी; नंदुरबार जिल्ह्याचे...

मृत्यूचं तांडव सुरू असताना रुसव्या फुगव्यामध्ये अडकले....

येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. महाराष्ट्रात अनागोंदी पसरली आहे. चोर दरोडेखोरांकडे जात आहेत, असा टोला राऊतांनी लगावला. नांदेड येथील मृत्यूप्रकरणी राज्यातील रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू असताना खातेवाटपावरून सगळे रुसव्या फुगव्यामध्ये अडकले आहेत. हे राज्याचे दुर्दैव आहे, असे राऊत म्हणाले.

सिंचन घोटाळ्यातील आरोपी तुमच्या शेजारी बसला...

राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधत फडणवीसांना टोला हाणला. "सिंचन घोटाळ्यातील आरोपी तुमच्या शेजारी बसला आहे," अशा शब्दांत राऊतांनी अजितदादांचे नाव न घेता टीका केली. राजभवनात भाजपने भंपक माणूस बसवला होता, असा टोलाही राऊतांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लगावला.

Sanjay Raut News
Ajit Pawar News : अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झाल्यावर बावनकुळे म्हणाले, "जे ठरलं होतं तेच झालं..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com