Uddhav Thackeray & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Effect: शिवसेनेला उत्तर देण्यासाठी ३ आमदारांसह अख्खी भाजप एकवटली!

Sampat Devgire

Shivsena`s Drive against Drug : शिवसेनेने आज ड्रग्जविरोधात शहरात मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. या वेळी शिवसेना नेत्यांनी भाजपवर केलेल्या प्रभावी राजकीय हल्ल्यांमुळे भाजपचे तीन आमदार, सर्वच प्रवक्ते शिवसेनेला उत्तर देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. (Shivsena strongly attacked on BJP with Drug mafia politics)

शिवसेनेने (Shivsena) आज ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये (Nashik) मोर्चा काढला. पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अत्यंत आक्रमकपणे सत्ताधारी पक्ष आणि भाजपवर (BJP) थेट हल्ला केला. त्यामुळे भाजपचे नेते संतप्त झाले.

या मोर्चाचा राजकीय परिणाम एवढा मोठा होता, की राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध टीकेला उत्तर देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

दुपारी हा मोर्चा झाल्यावर भाजपच्या शहरातील आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप आणि सतीश नाना कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, अजित चव्हाण अशा विविध नेत्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. घाई घाईत बोलावलेल्या या पत्रकार परिषदेचा उद्देश सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा हा होता.

भाजपच्या पत्रकार परिषदेचा उद्देश अर्थातच शिवसेनेने ड्रग्जविरोधात उघडलेल्या मोहिमेत भाजपच्या काही नेत्यांचे नाव न घेता केलेला हल्ला, पालकमंत्री दादा भुसे तसेच काही आमदारांना ड्रग्ज प्रकरणात हप्ते मिळत असल्याचा आरोप आदी कारणे होती. याबाबत थेट प्रदेश कार्यालयातूनच सूचना आल्याने भाजपचे झाडून सर्व नेते शिवसेनेवर टीका करण्यासाठी एकत्र आले. हा सर्व शिवसेनेच्या मोर्चातील संजय राऊत यांच्या आक्रमक टीकेचाच इफेक्ट असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT